दिवाळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येकजण आपली दिवाळी कशी छानप्रकारे साजरी करता येईल याकडे लक्ष लावून बसलेला असतो. दिवाळी आली की, नवनवीन कपडे दिवाळीचा फराळ बनवण्यात सर्वजण व्यस्त असतात. हे केवळ सर्वसामान्य व्यक्तींच्याच आयुष्यात घडते असे नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. दिवाळी या सणासाठी प्रत्येक कलाकार खूप उत्साही असतात. त्याचबरोबर दिवाळीसाठी बनवलेले गोड पदार्थ खाण्यासाठी देखील कलाकार खूप उत्सुक असतात. मात्र, मोठ्या प्रमाणात हे पदार्थ खाल्ल्याने त्यांचा डाएट प्लॅन फिस्कटतो. यासाठीच आता दिवाळीचे गोड पदार्थ खायला मिळावे यासाठी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन जास्त वर्कआऊट करत आहे. त्याचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
वरुण त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. म्हणूनच आता तो दिवाळीसाठी बनवलेले गोड पदार्थ खाल्ल्याने त्याचा डाएट प्लॅन बिघडू नये आणि त्याचा त्याच्या फिटनेसवर परिणाम होऊ नये, म्हणून तो हार्ड वर्कआऊट करत आहे. नुकताच आता त्याचा एक व्हिडिओ फिल्मफेअरने शेअर केला आहे, ज्यात तो त्याचे सिक्सपॅक दाखवताना दिसत आहे.
फिल्मफेअरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आता दिवाळीत भरपूर मिठाई खाण्यासाठी आधीच घाम गाळत आहे, जेणेकरून वरुण धवन मनसोक्त गोडधोड खाऊ शकेल.”
Looks like @Varun_dvn has sweat enough to start binging guilt-free on some Diwali sweets now. pic.twitter.com/kulktphLbe
— Filmfare (@filmfare) November 3, 2021
वरुणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३ हजारांपेक्षाही अधिक व्हू्यज मिळाले आहेत. त्याच्या या व्हिडिओला चाहते मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत, तर काही युजर्स त्याला ट्रोल देखील करत आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देत असे लिहिले की, “याला कोण काम देत नाही का?” त्याला या व्हिडिओमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागत आहे.
वर्कफ्रंटवर बोलायचे झाले, तर वरुण धवन शेवटचा ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान दिसली होती. सध्या वरुण त्याच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणही कोरोनाच्या विळख्यात आला आहे. ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात वरुणसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. वरुण धवनने आतापर्यंत ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘मैं तेरा हिरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बदलापूर’, ‘एबीसीडी २’, ‘दिलवाले’, ‘जुडवा २’, ‘सुई धागा’, ‘कलंक’ आणि ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’