Sunday, June 16, 2024

‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल

हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून सर्वात पहिले विद्या बालनचे नाव येते. विद्याचा प्रभावी आणि जिवंत अभिनय नेहमीच प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुकास पात्र ठरत असतो. विद्या ही अशी अभिनेत्री आहे जिने तिच्या लूक्सने नाही तर कामाने आणि अभिनयाने नाव कमावले आहे. विद्याचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटल्यावर या सिनेमातून काहीतरी नवीन आणि तिच्या अभिनयाचा वेगळा पैलू पाहायला मिळणार या विचाराने तिचे फॅन्स खूपच उत्साहित असतात. विद्यादेखील त्यांना कधीही नाराज करत नाही, आपल्या दमदार अभिनयाने ती नेहमी प्रेक्षकांचे मनं जिंकतच असते.

‘शकुंतला देवी’ चित्रपटाच्या जवळपास एक वर्षानंतर विद्या तिचा आगामी ‘शेरनी’ सिनेमा घेऊन आली आहे. चित्रपटाचे नाव हे विद्याच्या रील आणि रियल अशा दोन्ही व्यक्तिमत्त्वांना साजेसे आहे. या सिनेमाची सर्वांनाच खूप प्रतीक्षा होती. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यापासून तर या प्रतीक्षेत अधिकच भर पडली. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला असून फॅन्सच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे.

सिनेमा अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाल्यानंतर विद्याच्या फॅन्सने सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल आणि विद्याच्या अभिनयाबद्दल कौतुक करणाऱ्या कमेंट्स पोस्ट केल्या आहेत. काहींनी आतापर्यंत विद्यासाठी जो आदर होता तो आदर हा सिनेमा पहिल्यानंतर अजून वाढला असल्याचे सांगितले आहे. या सिनेमात विद्याने एक वन अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून विद्या सांगणार आहे की, वाघ नरभक्षी का बनतात. (vidya balan movie sherni social media review by audience)

https://twitter.com/kavya_reddy01/status/1405626653837959169?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1405626653837959169%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fentertainment%2Fott%2Fvidya-balan-movie-sherni-twitter-and-social-media-review-by-audience-700770.html

सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या अमित मासूरकर यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितले की, “या सिनेमासाठी आणि मुख्य भूमिकेसाठी आम्ही पहिली विचारणा विद्यालाच केली. वन विभागात फॉरेस्ट गार्ड्स, ऑफिसर, ऑफिस स्टाफ आदी वेगवेगळ्या पदांवर स्त्रिया काम करत असतात. विद्या इतकी सुंदर अभिनेत्री आहे की तिने तिची भूमिका खुपच कमी वेळात आत्मसाद केली. आम्ही २०१९ वर्षाच्या अखेरीपासूनच या सिनेमावर काम करत होतो. २०२० मध्ये शूटिंग चालू झाल्यानंतर काही दिवसातच कोरोनामुळे सर्व काही थांबवण्यात आले.”

शूटिंग पुन्हा सुरु होण्याबद्दल अमित म्हणाले, “त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये पुन्हा आम्ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शूटिंगला सुरूवात केली. सुदैवाने आमच्या सिनेमाचे जास्तकरून शूटिंग जंगलात होत असल्याने आम्ही गर्दीपासून लांब होतो. सेटवर आम्ही सर्व मास्क, पीपीई किट आणि फेसशील्ड घालायचो. सीन संपल्यानंतर कलाकार देखील लगेच मास्क घालायचे. या सर्वांमध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने शुटिंग पूर्ण केले आणि आज आमचा सिनेमा प्रदर्शित होत आहे.”

टी सीरीज निर्मित असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन ‘न्यूटन’ सिनेमा फेम दिग्दर्शक अमित मासूरकर यांनी केले आहे. या सिनेमात विद्यासोबतच शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला

-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित

हे देखील वाचा