बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून विद्या बालनचे नाव आधी घेतले जाते. तिने तिच्या प्रतिभेच्या जोरावर मोठी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे. विद्याने तिच्या करियरमध्ये अनेक उत्तम भूमिका केल्या आहेत. सिनेमात विद्या असणार म्हटल्यावर नक्कीच काहीतरी वेगळा आणि चांगला सिनेमा असणार यात शंका नाही हे आधीच सर्वाना माहित असते. प्रवाहापेक्षा वेगळा विचार करणारी विद्या नेहमीच इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी ठरते. नुकताच एका मुलाखतीदरम्यान तिने एक खुलासा केला आहे.
सगळयांना अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि विद्या यांचा ‘पा’ हा सिनेमा आठवतच असेल. हा सिनेमा अनेक कारणांसाठी आजही चर्चेत असतो आणि गाजतो. सोबतच अनेक कारणांसाठी हा सिनेमा खास देखील ठरला किंबहुना आहे. याच सिनेमाबद्दल विद्याने काही खुलासे केले आहेत. विद्याने सांगितले की, अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारणे तिच्यासाठी सोपे नव्हते. यासाठी तिने काही काळ घेतला होता.
View this post on Instagram
आर बल्की दिग्दर्शित ‘पा’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी १२ वर्षाच्या प्रोजेरिया नावाच्या आजाराने ग्रस्त अशा मुलाची भूमिका साकारली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले की, जेव्हा तिला या रोलसाठी विचारणा झाली तेव्हा तिने ही स्क्रिप्ट काही मित्रांना पाठवली आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहिली. ती म्हणाली, “मला त्या सिनेमासाठी हो म्हणाल्या बराच काळ लागला कारण जेव्हा बल्की सर माझ्याकडे आले तेव्हा मी आधी विचार केला की ‘ही अशी कशी कहाणी’ आहे? ते वेडे आहे का आणि अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेसाठी ते माझ्याकडे का आले? ही एकमेव स्क्रिप्ट होती, जी मी माझ्या मित्रांसोबत शेअर केली. सुरुवातीला थोडे विचित्र वाटल्यानंतर लगेच मला जाणवले की ही एक उत्तम स्क्रिप्ट आहे.”
पुढे विद्या म्हणाली, “एक अभिनेत्री म्हणून मला हा सिनेमा करायचा होता. मात्र मला वाटत होते की लोकांनी ते वाचावे आणि मला सांगावे त्यांना काय वाटते? त्यानंतर त्यांनी सर्वानी मला सांगितले तुला ही भूमिका करायची आहे. तू करच. त्यांनतर देखील मला हो म्हणायला वेळ लागला. मी माझ्या मनाचा आवाज ऐकला आणि मग हो उत्तर दिले.” या सिनेमात अमिताभ, अभिषेक हे खऱ्या आयुष्यातील बाप लेक दिसले मात्र सिनेमात अभिषेकने अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. हा एक उत्तम सिनेमा होता ज्यासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण










