Wednesday, June 26, 2024

‘स्वतःवरचा विश्वास उडाला होता’ विद्या बालनने केले तिच्या आयुष्यातील ‘त्या’ भयानक काळाबद्दल भाष्य

बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री म्हणून विद्या बालनची ओळख आहे. आपल्या अतिशय जीवनात अभिनयातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज जरी ती बॉलिवूडवर राज्य करत असली तरी एक काळ असा होता, जेव्हा विद्याला तिला अभिनयात येऊ द्यावे यासाठी घरच्यांची खूपच मनधरणी करावी लागली होती. ती का शिस्तप्रिय दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून या क्षेत्रात आली आहे.

विद्याने नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिच्या सुरुवातीच्या काळातील काही आठवणींना उजाळा दिला आहे. तिने सांगितले की, “माझ्या आईला कुठेतरी वाटत होते की, मी एक अभिनेत्री व्हावे. तेजाब सिनेमा आला तेव्हा मी आठ वर्षांची होती. त्यातील एक दोन तीन गाण्यावरील माधुरीचा डान्स पाहून मी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.”

Vidya Balan
Photo Courtesy: Instagram/balanvidya

पुढे विद्या म्हणाली, “माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी काही ऑडिशन दिल्या होत्या. मात्र मला माझ्या ज्या पहिल्या शोसाठी साइन केले गेले होते, त्यात मी कधी कामच केले नाही. तेव्हाच मला ‘हम पांच’ मिळाला. माझे पालक यासाठी तयार होते. कारण त्यांना वाटले की टीव्ही एक सुरक्षित पर्याय आहे. शिवाय हा शो कॉमेडी आणि कुटुंबासोबत बसून पाहू शकतो असा होता. तो शो काही काळ मी केला आणि नंतर त्याला रामराम म्हटले. पुढे मी जाहिराती करण्यास सुरुवात केली. हेच माझ्यासाठी टर्निंग होते. मला वाटते की जर मी तो शो सोडला नसता तर मी काहीच करू शकले नसते.”

Photo Courtesy: Instagram/balanvidya

पुढे विद्याने तिला अपशकुनी का म्हणायचे हे सांगतिले. ती म्हणाली, “मला मोहनलाल त्यांच्या सोबत एका मल्याळम् चित्रपटात एका भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने तो चित्रपटच रद्द करण्यात आला. याशिवाय इतर काही प्रोजेक्ट्ससाठी अनौपचारिकपणे माझ्याशी संपर्क साधला होता. पण माझ्याबाबतीत त्या रद्द झालेल्या चित्रपटाच्या अफवा पसरू लागल्या आणि लोकांनी मला अपशकुनी म्हणून बोलण्यास सुरुवात केली. यामुळे माझ्या हातून अनेक चित्रपट निसटले होते. माझा स्वतःवरचा विश्वास उडाला होता. अनेक नाकारांचा सामना केल्यामुळे मला नैराश्यासारखे जाणवू लागले. तीरी मी जाहिराती करत होते. याच दरम्यान मी प्रदीप सरकार यांना भेटले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी मला माझ्याबरोबर चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले. मी ‘परिणीता’ चित्रपट निवडला नव्हता, चित्रपटाने माझी निवड केली होती.”

दरम्यान विद्या अतिशय लोकप्रय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिचे सर्वच सिनेमे दमदार चालतात तिला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा