कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लवकरच चित्रपटगृह सुरू होणार आहे. मात्र हे चित्रपटगृह सुरू करताना अनेक नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. असे असूनही अनेक चित्रपट निर्माते अजूनही ओटीटी प्लॅटफॉर्मलाच चित्रपट प्रदर्शनाची पसंती देत आहे. अजूनही अनेक मोठे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत विद्युत जामवालच्या ‘सनक’ सिनेमाचा समावेश झाला आहे.
नुकताच या ‘सनक’ चित्रपटाचाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांनी दमदार ऍक्शन असणारा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. विद्युत जामवाल हा त्याच्या जबरदस्त फिजिक्समुळे आणि कडक ऍक्शनमुळे ओळखला जातो. विद्युतच्या आतापर्यंतच्या सर्वच सिनेमांमध्ये हटके ऍक्शन पाहायला मिळाली. विद्युतचे नाव उच्चारले तरी सिक्सपॅक असणारा मार्शल आर्टमध्ये निपुण आणि कडक ऍक्शन करणारा अभिनेता डोळ्यासमोर येतो. विद्युतने त्याच्या पहिल्या सिनेमापासून ऍक्शनपट करण्याची परंपरा आजतागायत राखली आहे. आता ‘सनक’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा तो ऍक्शन करताना दिसणार आहे.
‘सनक’ सिनेमाच्या २ मिनिट ३६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये विदुयतच्या पत्नीचे हृदयाचे ऑपरेशन दाखवले आहे, आणि तेव्हाच काही आतंकी त्या हॉस्पिटलवर हमला करत हॉस्पिटलमध्ये तळ ठोकतात. हॉस्पिलमध्ये असणाऱ्या लोकांना मारतात. विद्युत त्यांना आणि पत्नीला वाचवण्यासाठी काही आतंकवाद्यांना मारतो. आपल्या पत्नीच्या भेटीसाठी आसुसलेल्या विद्युत अनेकांना वाचवतो तर हमळावरण मारतो देखील. यातच पोलीस अधिकारी असणारी नेहा धुपिया एन्ट्री घेते आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते. आता विद्युत त्याच्या पत्नीला भेटण्यास यशस्वी होतो का? आतंकी त्याला पकडतील का? आदी अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमा पाहिल्यावर मिळतीलच. सिनेमाचं ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली यात काहीच शंका नाही.
विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित ‘सनक’ सिनेमा येत्या १५ ऑक्टोबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-किंग खानच्या लाडक्या मुलाला ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीचा पाठिंबा; म्हणाली, ‘तो चांगला मुलगा आहे…’
-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन