Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड भेटायला आलेल्या चाहतीला दिले भन्नाट सरप्राईज, विद्युत जामवालच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

भेटायला आलेल्या चाहतीला दिले भन्नाट सरप्राईज, विद्युत जामवालच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) हा हिंदी तसेच दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या डॅशिंग लूकसाठी आणि खतरनाक एक्शन सीनसाठी तो जगभरात प्रसिद्ध आहे. कमांडो, कमांडो २ या गाजलेल्या चित्रपटातून सर्वत्र प्रसिद्धी मिळवलेल्या विद्युतचा चाहता वर्गही मोठा आहे. विशेष करुन मुलींमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. आपल्या लाडक्या हिरोसोबत सेल्फी काढण्यासाठी त्या नेहमीच गर्दी करत असतात. सध्या एका अशाच चाहतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये विद्दुतने थेट आपल्या कारमधूनच या मुलीला फिरवल्याचे दिसत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्युत त्याच्या लक्झरी कार ‘Aston Martin DB 9’ जवळ उभा असल्याचे दिसून येत आहे. याचवेळी एक महिला चाहती अचानक त्याच्याकडे येते आणि त्याला भेटण्याचा आनंद व्यक्त करते. यावेळी विद्युतने केवळ तिचे म्हणणेच ऐकले नाही तर त्याला मिठी मारली आणि त्याच्या ब्रँडेड कारमध्ये लाँग ड्राईव्हवर नेले. खरंच, हा क्षण तिच्या चाहत्यांसाठी खूप आश्चर्याचा ठरला असेल.

अभिनेता विद्युत जामवाल त्याचा आगामी चित्रपट ‘खुदा हाफिज 2’ च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. त्यादरम्यान ही घटना घडली आणि आता सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने ‘जम्मू का दिलदार’ म्हटले आहे. तर आणखी एका यूजरने , ‘त्याची ही स्टाइल त्याला सर्वात वेगळी बनवते. तो इतर अभिनेत्यांसारखा नाही, जे मागे वळून निघून जातात असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.  वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर विद्युत शिवलीका ओबेरॉय आणि दानिश हुसैन यांच्यासोबत खुदा हाफिज 2 या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ८ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हे देखील वाचा