Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड उंचीमुळे चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री दीपिका पेक्षाही आहे उंच, विद्युत जामवालसोबत झळकणार ‘सनक’ चित्रपटात

उंचीमुळे चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री दीपिका पेक्षाही आहे उंच, विद्युत जामवालसोबत झळकणार ‘सनक’ चित्रपटात

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा सिनेइंडस्ट्रीमध्ये जबरदस्त ऍक्शनसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीची आणि जबरदस्त चित्रपटांची सिने जगतात कायमच चर्चा होत असते. अनेक सुपरहिट चित्रपट त्याच्या नावावर आहेत, त्यामुळेच त्याचा चाहता वर्ग ही खुप मोठा आहे. नुकताच त्याच्या ‘सनक’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये विद्युतच्या ऍक्शन सोबतच सिनेमाच्या अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या चित्रपटात विद्युतसोबत दिसणारी अभिनेत्री नवीन असून तिचे नाव आहे, रुक्मिणी मैत्रा. रुक्मिणी मैत्रा ही या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. परंतु बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच रुक्मिणी तिच्या लूक आणि उंची मूळे चर्चेत आली आहे.

रुक्मिणी मैत्राचा जन्म कोलकात्यात झाला असून वयाच्या १३व्या वर्षांपासून तिने मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली. यापुर्वी ती अनेक बंगाली कार्यक्रमात ही झळकली आहे. जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा म्हणून रुक्मिणी ओळखली जाते. तिने रिलायन्स, व्होडाफोन, टाटा टी, सनस्क्रीन, रॉयल स्टॅग, फेमीना, आणि इमामी यांसारख्या प्रसिद्ध ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत.

रुक्मिणीने २०१७ साली तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘कॉकपीट’,’कबीर’,’किडनॅप’ या चित्रपटात रुक्मिणीने काम केले आहे. यासोबतच रुक्मिणी अजून एका गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ती गोष्ट म्हणजे तिची उंची. हो रुक्मिणी तिच्या उंचीमुळे खूपच प्रकाशझोतात आली आहे. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि क्रिती सेननपेक्षा तिची उंची जास्त आहे. इंडस्ट्रीमध्ये जास्त उंची असलेल्या अभिनेत्री चालत नाहीत असा पूर्वी समज होता, परंतु दीपिका पदुकोणच्या येण्याने हे सगळे समीकरण चुकीचे ठरले आहेत. दीपिकाची उंची तर बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते असणाऱ्या सलमान, शाहरुख आणि आमिर खान पेक्षा जास्त आहे. दीपिकाची उंची १७४ सेंटिमीटर म्हणजे ५ फुट ९ इंच इतकी आहे. त्यापेक्षा जास्त उंची रुक्मिणीची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुक्मिणीची उंची १९० सेंटिमीटर इतकी आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, रुक्मिणीच्या उंची इतका अभिनेता याइंडस्ट्रीमध्ये सुद्धा नाहीये. दरम्यान रुक्मिणी मैत्रा आणि विद्युत जामवालचा ‘सनक’ हा जबरदस्त ऍक्शन चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १५ ऑक्टोंबर रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात चंदन रॉय आणि नेहा धूपिया सुद्धा झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’

हे देखील वाचा