Friday, July 5, 2024

दाक्षिणात्य सिनेसृष्टीची सौंदर्यवती नयनतारा अडकली विवाह बंधनात, दिग्गज बॉलिवूड कलाकारांची लग्नाला हजेरी

दाक्षिणात्य सिनेजगताची सौंदर्यवती नयनताराच्या (Nayanthara) आणि चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवनच्या (Vignesh Shivan) प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू होती. या चर्चांना पुर्णविराम देत दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत.  गुरुवार ( ९ जूनला) हा विवाह सोहळा पार पडला असून या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शेरेटन हॉटेल महाबलीपुरम येथे हा विवाह सोहळा पार पडला. शाही विवाह सोहळ्यासाठी दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहिले आहेत. यामध्ये  अभिनेता शाहरुख खाननेही या लग्नाला हजेरी लावली आहे. वधूच्या पोशाखात नयनतारा खूपच मनमोहक दिसत आहे. या नवीन जोडीचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत असून नयनताराच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

लग्नाला काही अवधी शिल्लक असतानाच विघ्नेशने एक सोशल मीडिया पोस्ट केली होती.  ज्यामध्ये त्याने नयनतारासोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले  होते. त्यासोबतच त्याने नयनतारासोबत लग्नगाठ बांधण्याबद्दलची उत्सुकता एक पत्रातून व्यक्त केली होती.  ज्यामध्ये तो म्हणतो की, “आज ९ तारीख आहे, माझ्या आणि नयनच्या आयुष्यात देवाने दिलेल्या आयुष्यामुळेच आज मी इथे आहे. प्रत्येक सुंदर व्यक्ती, प्रत्येक सुंदर मन, प्रत्येक सुंदर क्षण आणि प्रत्येक प्रार्थनेमुळे आयुष्य इतके सुंदर झाले आहे. काही क्षणातच माझी वधू होऊन या आवारात तुला फिरताना पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. त्याचबरोबर मी माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठीही खूपच उत्सुक आहे,”

 

दरम्यान नयनतारा ही दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दाक्षिणात्य सिनेजगतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणूनही तिचे नाव आघाडीवर आहे. बिगिल, अन्नाथे, राजाराणी, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तर पती विघ्नेश हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. लवकरच नयनतारा शाहरुख खानसोबत चित्रपटात झळकणार आहे.

हे देखील वाचा