Monday, July 1, 2024

पत्रकारासमोरचं विजय देवरकोंडाने केले ‘असे’ कृत्य, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) त्याच्या अभिनयाइतकाच साध्या राहणीमानासाठीही सिने जगतात विशेष प्रसिद्ध आहे. अभिनेत्री अनन्या पांडेसोबतच्या त्याच्या लायगर चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू असून दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहेत. विजय देवरकोंडाचा चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडिओतील त्याच्या कृतीने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

साउथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या हटके स्टाईलसाठी सिने जगतात विशेष प्रसिद्ध आहे. आजकाल विजय देवरकोंडा त्याच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान विजय देवरकोंडाने मुंबईत लिगरच्या प्रमोशन दरम्यान असे काही केले आहे, ज्यामुळे तो सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. मात्र, टीकाकारांना उत्तर देताना विजय देवरकोंडाने आपली बाजू मांडली आहे.

विजय देवरकोंडा त्याची सहकलाकार अनन्या पांडेसोबत ‘लाइगर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत पोहोचला होता. या पत्रकार परिषदेदरम्यान एका मीडिया पत्रकाराने विजयला सांगितले की, मी टॅक्सीवाला चित्रपटाच्या वेळी तुमची मुलाखत घेतली होती. पण सध्या तू खूप मोठा स्टार झाला आहेस, त्यामुळे आता तुला प्रश्न करायला मला संकोच वाटतो.

यावर विजय देवरकोंडा यांनी निःसंदिग्धपणे उत्तर दिले की, कंपर्टेबल व्हा असे सांगितले. आणि मग विजयने आरामात समोरच्या टेबलावर पाय ठेवला. त्यासोबतच विजयने त्या पत्रकारालाही तसे करण्यास सांगितले. हीच चूक विजय देवरकोंडासाठी अडचणीची ठरली आणि नंतर लोकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. यासोबतच त्याच्या लायगर या चित्रपटालाही लक्ष्य करण्यात आले.

सोशल मीडियावर या ट्रोल झाल्यानंतर, विजय देवराकोंडाने त्याची बाजू मांडताना जेव्हा एखादी व्यक्ती पुढे सरकते तेव्हा लोक त्याला लक्ष्य करू लागतात. अशा परिस्थितीत आम्ही ही लढाई लढत राहू. पण जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि तुम्हाला सर्वांत चांगले हवे असेल तर देव आणि लोकांचे प्रेम तुम्हाला साथ देईल. असा संदेश दिला. दरम्यान या महिन्याच्या १५ तारखेला विजय देवरकोंडाचा लिगर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा –

शिल्पा शेट्टीच्या मुलांचा ‘राधाकृष्ण’ लूक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा