सध्या आख्ख्या जगाचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागले आहे. ती गोष्ट म्हणजे, आशिया चषक 2022मधील भारत आणि पाकिस्तान संघातील सामना होय. हा सामना तब्बल 132 देशातील चाहते पाहत आहेत. काही प्रेक्षकांना थेट मैदानात जाऊन हा बहुचर्चित सामना पाहण्याची संधी मिळालीये, तर काहीजण ओटीटी किंवा टीव्हीवर पाहत आहेत. थेट मैदानात जाऊन पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये अभिनेत्याचाही समावेश आहे. तो अभिनेता म्हणजेच विजय देवरकोंडा होय.
रविवारी (दि. 28 ऑगस्ट) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघात सामना खेळला जातोय. हा सामना पाहण्यासाठी साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यानेही हजेरी लावली. विजयचे यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
Vijay Deverakonda in stands ????#INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/EpGQzyouVK
— Snigdha ♡ (@MoodySnig) August 28, 2022
Vijay deverakonda in today's match????????????#INDvPAK #IndiaVsPakistan #LigerHuntBegins #VijayDevarakonda pic.twitter.com/VrLbFFkHKR
— Md Shahbaz Alam (@iamvillen) August 28, 2022
विजय देवरकोंडाच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो 25 ऑगस्ट प्रदर्शित झालेल्या ‘लायगर’ या सिनेमात दिसला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. मात्र, जसा दिवस पुढे सरकला, सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली. सध्या विजय दुबईत असून भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात उपस्थित राहून भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निया शर्माच्या बोल्डनेसचा जलवा! अवघ्या 30 सेकंदाच्या व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड
सेक्स क्लिपनंतर पूनम पांडेसोबत दिसली ‘कच्चा बदाम’ गर्ल; नेटकरी म्हणाले, ‘आता दोघी एमएमएस…’
शाहरुख खानच्या चित्रपटात झळकणार होती आलिया, परंतु ‘या’ कारणामुळे दिला नकार