Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा लय भारी! विजय देवरकोंडाच्या प्रायव्हेट जेटमध्ये बसून पुरते घाबरले त्याचे आई-बाबा; व्हिडिओ जोरदार व्हायरल

लय भारी! विजय देवरकोंडाच्या प्रायव्हेट जेटमध्ये बसून पुरते घाबरले त्याचे आई-बाबा; व्हिडिओ जोरदार व्हायरल

प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते की, एकदा तरी आपल्या मुलाने आपल्याला फिरायला किंवा देव-दर्शनाला घेऊन जावे. हे कलाकारांनाही अपवाद नाही. काहीजण आपल्या आई- वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यात यशस्वीही होतात. मात्र, तुम्हाला असे सांगितले की, एकाने आपल्या आई- वडिलांना चक्क आपल्या स्वत:च्या विमानातून देवाचे दर्शन घडवलंय, तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. होय ही कामगिरी केलीय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडाने.

रविवारी (१० ऑक्टोबर) विजय देवरकोंडाने आपल्या आई- वडिलांना तिरुपतीचे दर्शन घडवले होते. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. विजयने आता एक सुंदर व्हिडिओ शेअर करत तिरुपतीचे दर्शनाबाबतची माहिती दिली आहे. या व्हिडिओत तो सांगत आहे की, आपल्या पालकांना आपल्या खासगी विमानात घेऊन जाण्याचा अनुभव कसा होता, हे सांगत आहे. (Vijay Deverakondas Parants Shivers Badly In His Private Jet On The Way To Trirupati See Video)

व्हिडिओ पाहून असे वाटते की, विजय देवरकोंडाचे आई- वडील पहिल्यांदाच खासगी विमानात बसत आहेत. ते दोघेही विमान उडताना घाबरले होते. यादरम्यान त्याची आई देवाकडे प्रार्थना करताना दिसत होती. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू फुटेल.

विजयच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर १ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

विजय देवरकोंडाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘अर्जुन रेड्डी’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

सुपरस्टार विजय देवरकोंडाचे चाहते त्याच्या बहुप्रतिक्षित ‘लायगर’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी हा चित्रपट ९ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु असे म्हटले जात आहे की, कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे आणि या कारणास्तव आता टीमला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

हे देखील वाचा