लोकप्रिय तमिळ अभिनेता विजय सेतुपती नेहमी त्याच्या चित्रपटासाठी चर्चेत असतो. मात्र आता तो एका भलत्याच कारणावरून चर्चेत आला आहे. नुकताच विजयचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे.
अभिनेत्यावर बेंगळुरू विमानतळावर एका अज्ञाताने हल्ला केला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विजय विमानतळावरून बाहेर पडत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर मागून हल्ला केलेला पाहायला मिळत आहे. विमानतळावर अचानक झालेल्या या हल्ल्याने विजय सेतुपतीला धक्काच बसला. ( vijay sethupathi was attacked by an unknown man at bangalore airport video went viral)
Actor #VijaySethupathi attacked in Bengaluru Airport. pic.twitter.com/lyJkeraFTO
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) November 3, 2021
व्हिडिओ पाहून असे दिसते की, विजय सेतुपतीसोबत असलेल्या त्याच्या असिस्टंटला बदला घ्यायचा होता, मात्र विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेता शूटिंगसाठी बंगळुरूला गेला होता.
हा व्हिडिओ एका पत्रकाराने पोस्ट केला आहे. हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या पत्रकाराला एका ट्विटर युजरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्वीट केले की, “काल रात्री केआयएएल येथे ही घटना घडली. विजय सेतुपतीचा असिस्टंट आणि आणखी एक मद्यधुंद प्रवासी यांच्यात काही वाद झाला. वादानंतर प्रवाशाने विजयच्या असिस्टंटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नंतर प्रवाशाने माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटले.”
सेतुपतीचा असिस्टंट आणि मद्यधुंद प्रवासी यांच्यात वाद झाला, त्यामुळे प्रवाशाने असिस्टंटवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा दावा युजरने केला आहे. प्रवाशाने माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मिटल्याचे त्याने सांगितले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर विजय सेतुपती शेवटचा ‘अॅनाबेल सेतुपती’ मध्ये दिसला होता. यामध्ये तापसी पन्नू देखील होती. हा हॉरर कॉमेडी चित्रपट १७ सप्टेंबर २०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर रिलीझ झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच ना! प्रसिद्ध निर्माते दीपक राणेंच्या आगामी ‘पॅन इंडिया सिनेमा’त झळकणार साऊथ कलाकार
‘जोडण्यापेक्षा जास्त आवश्यक आहे सोडून देणे’, म्हणत समंथाने शेअर केला व्हिडिओ