Sunday, October 6, 2024
Home बॉलीवूड रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटात बिभिषणाची भुमिका साकारणार ‘हा’ साउथचा अभिनेता

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटात बिभिषणाची भुमिका साकारणार ‘हा’ साउथचा अभिनेता

गतवर्षी बाॅलिवूडचे दिग्दर्शक नितेश तिवारीने ‘रामायण ‘ चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. यासोबतंच त्यांनी चित्रपटात रामाची प्रमुख भुमिका रणबीर कपूर(Ranbir kapoor) करणार असल्याचेही सांगितले होते. रणबीरच्या रामायण (Ramayan) चित्रपटात आता साउथचा सुपरस्टार विजय सेतुपतीही(vijay sethupathi) दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरी या चर्चेंना उधान आले असले तरीही दिग्दर्शक नितेश तिवारी किंवा त्यांच्या टीमकडून या चर्चेला अजुन कसलीही पुष्टी मिळाली नाहीए.

विजय सेतुपती साकारणार बीभीषण
पिंक विला च्या रिपोर्टनुसार रणबीर ‘राम’ , साई पल्लवी (Sai Pallavi) ‘सीता’, आणि यश (Yash)’रावणा’ची भुमिका साकारणार आहे. त्याचसोबत दिग्दर्शक नितेश तिवारीने बीभीषणाच्या भुमिकेसाठी विजय सेतुपतीची निवड केली आहे. या भुमिकेसाठी त्याला विचारणाही केली आहे. जर सर्वकाही प्लॅननुसार झाले तर नितेश तिवारी लवकरंच चित्रपटाच्या शुटला सुरुवात करतील. बीभीषण अर्थात रावणाचा भाऊ. ही भुमिका साकारंत विजय आणि यश एकत्र स्क्रिन शेअर करतील.
सुत्रांकडुन अशी माहीती समोर आली आहे की, या रोलच्या संदर्भात नितेश तिवारींनी मध्यंतरी विजय सेतूपतीचा भेट घेतली होती. त्यावेळी ते स्क्रीप्ट देखील सोबत घेवुन गेले होते. विजयला स्क्रिप्ट नरेट केल्यावर त्याला ही स्क्रीप्ट आवडली देखील. सध्याला त्यांच्यात याविषयी बेलणं सुरु आहे. परंतु फिसच्या कारणामुळे विजय सेतुपतीने अजुन हा चित्रपट साइन केला नाही.

रिपोर्टनुसार नितेश तिवारीचा(Nitesh Tiwari) हा चित्रपट खुप मोठा चित्रपट असणार आहे. यात हनुमानच्या भुमिकेसाठी सनी देओलचं(Sunny deol) नाव पुढे आलं आहे, तर कैकयीच्या पात्रासाठी लारा दत्ताला(Lara Datta) विचारणा केली आहे. नितेश तिवारी या चित्रपटाच्या संदर्भात बाॅबी देओलकडे देखील गेले होते. बाॅबी देओलला त्यांनी कुंभकर्णाच्या भुमिकेसाठी विचारले होते. मात्र अभिनेत्याने या रोलसाठी नकार दिला आहे.

रामायण नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा मिळुन बनवत आहेत. या चित्रपटाला पुढच्या वर्षी 2025च्या दिवाळीत प्रदर्शित केले जाणार आहे. चित्रपटाची प्री-प्रोडक्शनची प्रोसेस सुरु झाली आहे. जर रिपोर्टचा विचार केला तर कास्ट लवकरंच फायनल होणार आहे. तरीही दिगदर्शक आणि टीमकडुन या स्टार कास्ट बद्दल कोणतीही अनाउंसमेंट केलेली नाही.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा