मराठी सिने जगतात असे अनेक अभिनेते तसेच दिग्दर्शक आहेत जे त्यांच्या अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतात. समाजातील अनेक विषयांवर हे कलाकार उघडपणे आपले मत मांडताना दिसत असतात.यामधीलच एक नाव म्हणजे विजू माने. मराठी सिने जगतातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. अनेक सामाजिक तसेच राजकीय विषयांवरील त्यांच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. काय आहे त्यांची ही व्हायरल पोस्ट चला जाणून घेऊ.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. या सत्तासंघर्षावर आणि नाट्यमय घडामोडींवर राजकीय नेत्यांसह अनेक कलाकारही भरभरुन प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. इतकेच नव्हेतर राज्याच्या या नाट्यमय घडामोंडीवर अनेक चित्रपट तसेच वेबसिरीजही तयार होताना दिसत आहेत. याबद्दलच दिग्दर्शक विजू माने यांची एक पोस्ट सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे. त्यांची ही पोस्ट जीवाच रान इन मतदान या सिरीजबद्दलची असल्याचे दिसत आहे.
अशी आहे विजू माने यांची पोस्ट
राजकारणावर हक्काने बोलणं हा जवळपास प्रत्येक शेंबड्या पोराचा जन्मसिद्ध अधिकार असतो. राजकारण हा गप्पा मारण्याचा सर्वात सोप्पा विषय असतो. अर्थात राजकारणी माणसांना भरघोस शिव्या देणे, त्यांच्यामुळे आपल्या देशाची कशी वाट लागली अन्यथा आपला देश अमेरिकेपेक्षा खूप पुढे असता, आपला देश हा राजकारण्यांनी कसा लुटला वगैरे वगैरे उद्वेगातून आलेली मतं असू शकतात.या राजकारण्यांना चौकात xxx करून मारलं पाहिजे वगैरे वगैरे काल्पनिक शौर्य कथा आजूबाजूला ऐकू येत असतात. शिवाय कोणता पक्ष कसा ‘चालू’ आहे आणि कोणता ‘बंद’ पडणार आहे याच्या राजकीय विश्लेषक असल्यासारख्या चर्चा घरी, ऑफिसमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये, सोशल मीडियावर, ‘न सोसल’ अशा मीडियावर, पानपट्टीवर, चहाच्या टपरीवर, बारमध्ये, सगळीकडेच कानावर आदळत असतात.
View this post on Instagram
“या ऐकत असताना राजकारणावर खरंतर राजकारणा’खाली’ असलेला एक पदर उलगडून काढावा असं वाटलं. खाजगीत गप्पा मारत असताना काही मित्रांकडून राजकारणातले विनोदी, गमतीशीर किस्से ऐकायला मिळत असतात. एकंदर महाराष्ट्रात जगाने दखल घ्यावी असं राजकीय घटनासत्र सुरू असताना, मला ही मालिका सापडावी हा निव्वळ योगायोग आहे. खरं तर हा वेबीसोड या सगळ्या घटनांच्या आधीच चित्रित झालेला आहे. या सगळ्या मतमतांतरामधून काही घटका करमणूक व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम तुमच्यासमोर आणतो आहे. चूक भूल द्यावी घ्यावी. गोड मानून घ्य.” दरम्यान विजू माने यांच्या या व्हायरल पोस्टवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
‘पुष्पा’ने २०२१ तर गाजवलंच, पण २०२२मध्येही धमाल सुरूच, ठरला एकमेव भारतीय सिनेमा