Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ शुक्लाच्या आईला एकटी म्हणणाऱ्या कलाकारांना विकास गुप्ताने धरले धारेवर; म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी आकस्मित निधन झाले आहे. सिद्धार्थच्या वडिलांचे निधन तो लहान असतानाच झाले होते. आता सिद्धार्थच्या पाश्चात्यात आई आणि दोन बहिणी आहेत. शुक्रवारी (३ सप्टेंबर) जेव्हा मुंबईतील ओशिवारा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते, तेव्हा आई रीता शुक्ला यांची अवस्था पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर, ‘बिग बॉस’ स्पर्धक असलेल्या विकास गुप्ताने त्याच्या आईला एकटे सांगणाऱ्या कलाकारांना एक ट्वीट करत खडसावले आहे.

विकास गुप्ताने ट्वीट करत लिहिले की, “सर्व कलाकार आणि त्यांच्या पीआरला वाटत आहे की, सिद्धार्थ शुक्लाची आई आता एकटीच आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की, त्यांना दोन मुली आहेत आणि शहनाझ गिल देखील आहे, हे विसरू नका. प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे आणि गरज भासल्यास या महिला तुमचीही काळजी घेऊ शकतात. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” (viral social vikas guta is angry and says sidharth shukla mom is not alone she has two daughters and dont forget shehnaaz gill)

माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थ एमटीव्हीच्या रियॅलिटी शो ‘एस ऑफ स्पेस’ च्या सीझन ३ चे सूत्रसंचालन करणार होता. आधीचे दोन्ही सीझन विकास गुप्ताने होस्ट केले होते. चॅनलने सिद्धार्थला त्याची लोकप्रियता लक्षात घेऊन होस्ट बनवण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धार्थच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन जग शोकसागरात आहे. परंतु शोमध्ये त्याचे साथीदार असलेले स्पर्धक सिद्धार्थच्या जाण्याने खूप दुःखी झाले आहेत. विकासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थसोबत बिग बॉसचे दिवस आठवताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. सिद्धार्थ शुक्लाचे कनेक्शन म्हणून विकास गुप्ता ‘बिग बॉस १३’ च्या घरात आला होता. शोमध्ये सिद्धार्थला जिंकवण्याची रणनीतीही त्याने आखली होती.

सिद्धार्थ आणि शहनाझ यांची ‘बिग बॉस १३’ दरम्यान मैत्री झाली होती. जी सिद्धार्थच्या मृत्यूपर्यंत टिकली. दोघांच्या चाहत्यांना या शोमधील जोडी इतकी आवडली की, चाहत्यांनी त्यांना ‘सिडनाझ’ नावाने हाक मारायला सुरुवात केली. अलीकडेच, जेव्हा ही जोडी ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली. तेव्हा शहनाझने सिद्धार्थ तिचा बॉयफ्रेंड नसून, तो त्याच्यापेक्षा खूप जास्त असल्याचे सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-TMKOC: जेठालाल झाला गंभीर जखमी, तर ‘यामुळे’ पोलिसांना करावी लागली गोकुळधाम सोसायटीच्या लोकांना अटक

-अरेरे! प्रार्थना अन् मायराच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? नेटकऱ्यांचाही उमटतायेत प्रतिक्रिया

-‘मैं नहीं नाचती, मेरा दिल नाचता है…’, मस्तानी बनली मराठमोळी मानसी नाईक; पाहून पती म्हणतोय…

हे देखील वाचा