कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे जगातील सर्वच मनोरंजन विश्वावर संकट आलेले असताना दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट कमाईमध्ये एकापेक्षा एक मोठे रेकॉर्ड बनवत आहे. मग भलेही ते सिनेमे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होवो किंवा ओटीटीवर प्रदर्शित होवो सर्वत्र या साऊथ चित्रपटांचा बोलबाला दिसून येत आहे. दाक्षिणात्य सिनेमे फक्त त्यांच्याच प्रदेशात नाही तर संपूर्ण देशात, परदेशात गाजताना दिसतात.
साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता असलेल्या चियान विक्रम (Vikram) त्याच्या आगामी चित्रपटामुळे खूपच प्रकाशझोतात आला आहे. त्याचा ‘महान’ या चित्रपटामुळे तो सध्या मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये खूपच चर्चेत आला आहे. या ‘महान’ सिनेमात चियान विक्रम (Vikram) त्याचा मुलगा ध्रुव (Dhruv) सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘महान’ चित्रपट पुढच्या आठवड्यात अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून प्रेक्षकांना सिनेमाबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वच आतुरतेने वाट बघत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो कमाईचे मोठे रेकॉर्ड बनवणार यात कोणतीच शंका नाही.
या चित्रपटाने तर प्रदर्शित होण्याआधीच एक मोठे रेकॉर्ड बनवले आहे. हे असे रेकॉर्ड आहे, जे कोणीही तोडू शकत नाही. आतापर्यंत अनेक भारतीय चित्रपटांमध्ये वडील मुलाची जोडी दिसली आहे. अशा चित्रपटांनी प्रेक्षकांचे तुफान प्रेम मिळवले. सनी-धर्मेंद्र, अभिषेक-अमिताभ आदी अनेक बाप बेट्यांच्या जोड्या आपल्याला चित्रपटांमध्ये दिसल्या. चियान विक्रम आणि ध्रुव ही पहिली बाप बेट्याची जोडी असणार आहे, जी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘महान’च्या आधी असा कोणताही सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला नव्हता, ज्यात वडील मुलाची जोडी दिसली होती.
चियान विक्रम ‘महान’ सिनेमाच्या निमित्ताने त्याच्या मुलाचे ध्रुवचे अभिनयाचे करिअर रुळावर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ध्रुवचे अभिनयातील पदार्पण अजिबात अपेक्षित असे नव्हते. त्यानंतर चियान विक्रम त्याच्या मुलाच्या करिअरसाठी खूपच मेहनत घेताना दिसत आहे. ‘महान’ हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा-