Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

 

सिद्धार्थने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विक्रम बत्रा यांची रील आणि रियल फॅमिली दिसत आहे. सिद्धार्थच्या खऱ्या कुटुंबासोबतच विक्रम बत्रा यांचे कुटुंब आणि आर्मी ऑफिसर्स देखील या स्क्रीनिंगला उपस्थित असल्याचे दिसत आहे. शिवाय या स्क्रीनिंगला असे आर्मी देखील होती, ज्यांनी विक्रम बत्रा यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रटाच्या दरम्यान बत्रा कुटुंबियांना त्यांचे अश्रू अनावर झाल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Vikram Batra Family Reaction After Watching Shershaah )

या तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये विक्रम बत्रा यांचा भाऊ विशाल बत्रा चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. सोबत तो हे देखील म्हणाला की, सिद्धार्थला पाहिल्यावर त्याला विक्रम यांची आठवण येते. शिवाय त्यांनी विक्रम यांचा ‘ये दिल मांगे मोर’ हा संवाद देखील म्हटला. आर्मीमधील लोकांपासून ते बत्रा कुटुंबीयांपर्यंत सर्वानीच ‘शेरशाह’ सिनेमाचे भरभरून कौतुक केले.

विक्रम बत्रा यांच्या वडिलांनी सांगितले की, “सिद्धार्थ आणि कियारा या दोघांची जोडी खूपच चांगली असून या दोघांचा अभिनय देखील उत्तम आहे. आम्ही जेवढे ऐकले, वाचले की विक्रमने तिथे काय काय केले ते सर्व आम्हाला चित्रपटाची माध्यमातून लाईव्ह पाहायला मिळत असल्याचे जाणवत होते.” तर विक्रम बत्रा यांच्या आईने सांगितले की, “आम्हाला विक्रम बत्रा आणि शेरशाहवर खूप गर्व आहे.”

हा सिनेमा अमेझॉनवर प्रदर्शित झाला असून, त्याला समीक्षक, प्रेक्षक आणि कलाकारांकडून खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Shershaah: ‘आम्हाला माधुरी दीक्षित द्या आम्ही निघून जातो’; पाकिस्तानींच्या या मागणीवर विक्रम बत्रा यांनी दिले होते भन्नाट उत्तर

-भुज: द प्राईड ऑफ इंडिया: अजय देवगणला मोठा झटका, चित्रपट झाला ऑनलाईन लीक

-कोण आहेत शहिद कॅप्टन विक्रम बात्रांच्या प्रेयसी डिंपल, का आहेत आजही अविवाहीत?

हे देखील वाचा