Tuesday, July 9, 2024

ऐकावं ते नवल! प्रसिद्ध दिग्दर्शकाने ५२ व्या वर्षी दुसऱ्यांदा थाटला संसार; आतापर्यंत ठेवले होते लपवून

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांच्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे. ५२ वर्षीय विक्रम भट्ट यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. विक्रम यांनी ‘राज’, ‘फुटपाथ’ आणि ‘घोस्ट’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव श्वेतांबरी सोनी आहे. विक्रम आणि श्वेतांबरी यांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान लग्न केले होते. त्यांनी आपले लग्न आतापर्यंत गुप्त ठेवले होते. एक वर्षानंतर, त्यांनी पत्नी श्वेतांबरीच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत माहिती दिली. विक्रम यांच्या लग्नाला त्यांचा भाऊ महेश भट्ट यांनीही दुजोरा दिला आहे.

त्याचवेळी, आता विक्रम भट्ट यांनी एक मुलाखत दिली आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या आणि श्वेतांबरीच्या गुप्त लग्नाचे कारण सांगितले आहे. त्याचवेळी, विक्रम भट्ट यांनी हे देखील सांगितले आहे की, त्यांचे प्रेम वेडेपणा नाही, परंतु ते आपल्या पत्नीसह आनंदी नाते एन्जॉय करत आहेत.

विक्रम यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती दिल्यानंतर एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या लग्नापासून ते डेटिंगच्या दिवसांबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे लग्न एका खाजगी समारंभात झाले होते, जिथे त्यांच्या फक्त तीन बहिणी होत्या आणि कुटुंबातील काही सदस्य त्यांच्यासोबत उपस्थित होते. पूर्वी, दोघांचीही भव्य लग्न करण्याची योजना होती, परंतु कोरोना महामारीने त्यांचे संपूर्ण नियोजन बिघडवले.

पुढे विक्रम भट्ट यांनी सांगितले की, दोघांनीही एकमेकांना तीन वर्षे डेट केले आहे. श्वेतांबरी आणि विक्रम यांची पहिली भेट एका प्रदर्शनादरम्यान झाली. ते प्रदर्शन पूर्ण होऊ शकले नाही, पण दोघांची मैत्री झाली होती आणि मग हळूहळू दोघेही प्रेमात पडले.

विक्रम भट्ट म्हणाले की, चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे आमच्यामध्ये असे काहीही घडले नाही. आम्ही दोघेही कॅन्डल लाईट डिनरला गेलो नाही आणि ना आम्ही अनेक शपथा घेतल्या. माझ्या वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आमच्यामध्ये या सगळ्याची सुरुवात झाली. डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी, श्वेतांबरीला समजले की, जर त्यापैकी कोणालाही काही झाले, तर ती पुढे जाण्यास सक्षम होणार नाही, जोपर्यंत कायदेशीर अधिकार तिच्याकडे येत नाही. श्वेता आणि माझे जे नाते आहे ते वेडेपणाचे नाही. आम्ही दोघे सुखी नात्याचा आनंद घेत आहोत.

विक्रम भट्ट यांचे पहिले लग्न झाले होते बालपणीच्या मैत्रिणीसोबत
विक्रम भट्ट यांचे पहिले लग्न त्यांची बालपणीची मैत्रीण अदितीसोबत झाले होते. दोघांनीही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट केले होते. त्याचबरोबर लग्नानंतर विक्रम आणि अदितीने त्यांची मुलगी कृष्णा यांचे स्वागत केले, जी आजच्या काळात चित्रपट दिग्दर्शिका आहे. विक्रम आणि अदितीचे नाते फार काळ टिकले नाही, म्हणून दोघांनी १९९८ मध्ये घटस्फोट घेतला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘त्या’ व्हिडिओत सलमानने दिलेले वचन केले पूर्ण; शाहरुख संकटात असताना धावला त्याच्या मदतीला

-“तो तुझा बाप होता”, म्हणत अनुपम खेर यांच्या आईने त्यांना फटकारले

-‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’

हे देखील वाचा