Thursday, July 31, 2025
Home मराठी ‘तुमचा वेळ वाया घालवू नका’, असे म्हणत विक्रम गोखले यांनी टेलिव्हिजनवरील मालिकांवर साधला निशाणा

‘तुमचा वेळ वाया घालवू नका’, असे म्हणत विक्रम गोखले यांनी टेलिव्हिजनवरील मालिकांवर साधला निशाणा

मालिका हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग आहे. काही मालिका प्रेक्षकांना आवडतात तर काही मालिकांन प्रेक्षक नकार दर्शवतात. निर्माते म्हणत असतात की, प्रेक्षकांना आवडत म्हणून आम्ही दाखवतो, तर प्रेक्षक म्हणतात की, ते आम्हाला दाखवतात म्हणून आम्ही बघतो. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी या विषयावर त्यांचे मत मांडले आहे. विक्रम गोखले हे नेहमीच समाजातील विविध घटकांवर त्यांचे मत व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी टेलिव्हिजनवरील मलिकाबाबत त्यांचे मत मांडले आहे.

विक्रम गोखले यांनी खास प्रेक्षकांना सल्ला दिला होता. ते म्हणाले की, “प्रेक्षकांनो तुमचा चॉईस तपासून पाहा आणि भिकार मालिका पाहणं बंद करा. तुम्हीच बंद करा म्हणजे त्यांना आवडत म्हणून आम्ही ते देतो, असे म्हणणारे जे आहेत त्यांच्यावर आपोआप बंदी येईल. त्यांच्यावर आली की, चॅनल वरही बंदी येईल.” ( Vikram gokhale statement about telivision serials, said don’t waste your time)

पुढे ते म्हणाले की, “पैसे मिळवण्यासाठी काहीही प्रेक्षकांच्या माथी मारलं जात आहे. अर्थहीन सुमार मालिका घाल पाणी घाल मीठ. अशा पद्धतीने प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत. मी विनंती करेल की, अशा भिकार मालिका पाहण बंद करा. स्वतःचा वेळ वाया घालवू नका. तुमचा चॉईस तपसा. त्यावर बंधन घाला. आपण काय पाहतोय? त्यातून काय मिळतंय? याचा जरा विचार करा.”

विक्रम गोखले म्हणाले की, “निरर्थक मालिका, तेवढेच निरर्थक सीन पाहून तुम्हाला काय मिळतं? अंतर्मुख करणारे सिनेमे, मालिका नाटकं जरूर पहा त्यामुळे चांगला नट तयार होतो. चांगले दिग्दर्शक येतील.”

यासोबत त्यांनी नागराज मंजुळे यांचे कौतुक देखील केले. नागराज मंजुळे यांनी ‘वैकुंठ’ नावाची वेबसीरिज तयार केली. या सीरिजला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यामुळे त्यांच्या कामाचे देखील त्यांनी खूप कौतुक केले.

हेही वाचा :

हे देखील वाचा