Wednesday, June 26, 2024

विक्रम सिनेमातील गाण्यावरून सुरु झालेल्या वादात टॉलिवूड अभिनेता सोहमने दिला कमल हसन यांना पाठिंबा

सुपरस्टार कमल हसन यांचा ‘विक्रम’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कमल हसन या सिनेमाच्या ताबडतोड प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बऱ्याच दिवसांनी कमल हसन यांचा सिनेमा येणार म्हटल्यावर त्यांचे फॅन्स देखील खूपच खुश आहेत. मात्र आता यातच या सिनेमाला घेऊन एक वाद समोर येत आहे. नुकतेच या सिनेमातील ‘पथाला पथाला’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. आता या गाण्याला प्रदर्शित होऊन अवघे काही तास उलटले आणि आता या गाण्याला घेऊन एक नवीन वाद समोर आला आहे. या गाण्यामध्ये ‘अँड्रियम’ हा शब्द असल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

या वादानंतर कमल हसन यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले असून यात टॉलिवूड अभिनेता सोहमचा देखील समावेश आहे. सोहमने सांगितले की, “चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अशाप्रकारचे वाद चुकीचे आहे. मला वाटते की केवळ एका गाण्याच्या आधारावर संपूर्ण चित्रपटाची निंदा नाही केली जाऊ शकत. अजून सिनेमा प्रदर्शित होणे बाकी आहे. जे लोकं कमल हसन यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराच्या चित्रपटावर टीका करतात त्यांनी आधी स्वतःच्या चित्रपटांकडे पाहिले पाहिजे. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचे अनेक सिनेमे वर्षानुवर्षे पाहत मी मोठा झालो आहे. कमल हसन यांचे डेडिकेशन आणि कमिटमेंट वाखाणण्याजोगे असून ते त्यांच्याकडून शिकले पाहिजे. मी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे.”

काही लोकांच्या म्हणण्यानुसार ‘अँड्रियम’ शब्दाचा वापर केंद्र सरकारला समोर ठेऊन केला गेला आहे. कमल हसन यांचा हा सिनेमा एक हाय ऍक्शन ड्रामा आहे. या सिनेमात कमल हसन यांच्यासोबत कालिदास जयराम, नारायण, अँटनी वर्गीस, विजय सेतुपती, फहद फासीज, अर्जुनदास आदी कलाकार दिसणार आहेत. ‘विक्रम’ हा सिनेमा येत्या ३ जूनला प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सिनेसृष्टी पुन्हा शोक सागरात, भरदिवसा ‘या’ प्रसिद्ध मॉडेलने घेतला गळफास

कल्पनेपलीकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही 

 

हे देखील वाचा