Saturday, June 29, 2024

‘आता बॉयकॉट करु नका…’ व्हायरल व्हिडिओमुळे नेटकरी झाले ऋतिक रोशनवर फिदा

अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा बॉलिवूडमधील सर्वात आकर्षक अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या कामासोबतच तो त्याच्या उत्तम डान्स मूव्ह आणि चांगल्या लूकसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. आता हृतिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहत्यांना त्याच्या नम्रतेची खात्री झाली आहे आणि ते त्याचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, हृतिक रोशन एका कार्यक्रमात खचाखच भरलेल्या गर्दीसमोर स्टेजवर दिसत आहे जेव्हा एक चाहता येतो आणि त्याच्या पायाला स्पर्श करतो, त्यानंतर हृतिक रोशन त्याला थांबवतो आणि लगेचच तो तरुण स्वतः. त्याच्या पाया पडतो. यानंतर तो फोटोही क्लिक करतो. हृतिकचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की तो खूप नम्र व्यक्ती आहे, त्यामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकू नये.

हेही वाचा – अटक वॉरंट आल्यानंतर सपना चौधरीचा व्हिडिओ व्हायरल; म्हणतेय, ‘आम्ही खानदानी गरीब…’
अनन्या पांडे आणि तारा सुतारियाची मारामारी? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘या’ प्रसिद्ध गायकावर तब्बल चार महिलांनी लावला लैंगिक शोषणाचा आरोप, एकीला गाडीमध्येच…

हे देखील वाचा