Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान( Saif Ali Khan) हे दोन स्टार अभिनेते एक सोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत असताना दिसणार आहेत. ‘विक्रम वेधा’ हा तामिळ चित्रपट 2017 मध्ये आला होता. यामध्ये आर माधवन आणि विजय सेतुपती दिसले होते आणि आता याच्या हिंदी रिमेक मध्ये ऋतिक रोशान आणि सैफ अली खान यांची जोडी झळकणार आहे. या चित्रपटाच्या क्रेजला पाहुन चित्रपट निर्मात्याने बुधवारी (24 ऑगस्ट)म्हणजे आज  या चित्रपटाचा टिझर लाॅंच केला आहे आणि चाहत्यांनी ऋतिक आणि सैफच्या जोडीला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.  या जोडीला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या टिझरने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

चित्रपटाचा १ मिनिट ४६ सेकंदांचा टीझर ‘विक्रम वेधा’च्या विश्वाची सफर घडवणारा आहे. शिट्ट्या वाजवण्याजोगे संवाद, मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक पार्श्वसंगीत आणि भावूक करणाऱ्या नाट्याने हा टिझर परिपूर्ण आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक पूर्ण पॅकेज असल्याचे संकेत देणारा टीझर खूपच आकर्षक आहे. अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्यासमवेत दिग्दर्शक पुष्कर-गायत्री यांच्या टीझरला डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कौतुकाचा वर्षाव होत आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पहायला मिळणार आहे.

‘विक्रम वेधा’ या अ‍ॅक्शन-थ्रिलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. ‘विक्रम वेधा’चे कथानक नाट्यमय वळणांनी भरलेले आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (हृतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. वेधा आपली कथा सांगत असताना विविध पैलू उलगडत जातात आणि विक्रमला वास्तवतेचे दर्शन घडते.

ऋतिक रोशन हा ‘वॉर’ या चित्रपटानंतर तीन वर्षाेना मोठ्या पडद्यावर  झळकताना दिसणार आहे. ऋतिक आणि सैफ अली खान यांची जोडी पहिल्यांदाच स्क्रिनवर पाहायला मिळनार आहे. विक्रम वेधानंतर ऋतिक ‘फाइटर’ या चित्रपहटातही दिसणार आहे. विक्रम वेधा हा चित्रपट 30 सप्टेंबर या दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होेण्यासाठी तयार आहे.

हेही वाचा- ‘वडापाव कोणेकाळी आधार होता’, अमोल कोल्हेंना आठवला संघर्षाचा काळ
‘या’ दाक्षिणात्य कलाकारांनी लग्नात ओतला पाण्यासारखा पैसा, पण संसार काही टिकला नाही
बॉयकॉट करुनही सुपरहिट! आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाची परदेशात छप्परफाड कमाई

 

हे देखील वाचा