12वी फेल’ (12th Fail) फेम अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच ७ फेब्रुवारीला विक्रांत आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर (Sheetal Thakur) यांच्या घरी एका चिमुकल्याचं आगमन झालं. आता या दोघांनी आपल्या लेकाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. इतकेच नव्हे तर त्याने नावही जाहीर केलं आहे.
नुकतचं विक्रांतने पत्नीसह आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याची पत्नी शीतलने बाळाला कुशीत घेतलं आहे. बाळाचा चेहरा नीट पाहायला मिळत नाहीय. शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिघं खुप सुंदर दिसत आहेत. हा खास फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये बाळाच्या नावाची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
“आम्ही आमच्या मुलाचे नाव वरदान ठेवले आहे..” असं म्हणत विक्रांतने दुसरा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक खेळणे दिसत आहे. त्या खेळण्यावर वरदान असं लिहलं आहे. विक्रांतनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
२०१५ मध्ये विक्रांत आणि शीतलच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावरील प्रसिद्धीपासून दूर ठेवत असत. दोघेही अल्ट बालाजीचा शो ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’मध्ये एकत्र दिसले आहेत. या शोमध्ये ती विक्रांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
शोमध्ये काम करत असताना, रिअल लाईफमध्येही दोघे एकमेकांच्या जवळ आले. बर्याच वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर विक्रांत आणि शीतल यांनी २०१९ मध्ये साखरपुडा केला. दोघांनीही आपल्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांनी २०२२ मध्ये लग्न केले.