Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘या’ कारणामुळे सासूनेच उगारली होती जावयावर चप्पल, अभिनेते विनोद मेहरा यांच्या आयुष्यातील रंजक किस्सा

‘या’ कारणामुळे सासूनेच उगारली होती जावयावर चप्पल, अभिनेते विनोद मेहरा यांच्या आयुष्यातील रंजक किस्सा

विनोद मेहरा (Vinod Mehra) हे हिंदी चित्रपट जगतातील एक प्रतिभावान अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आजही विनोद मेहरा यांच्या चित्रपटांची तसेच अभिनयाची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. आपल्या अभिनयाइतकेच विनोद मेहरा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिले. जाणून घेऊ त्यांच्या लग्नाचा असाच एक गाजलेला किस्सा. 

विनोद मेहरा आपल्या चित्रपटांबद्दलच नाही तर चार-चार लग्नं केल्यामुळेही खूप चर्चेत राहिले. विनोद मेहरा यांनी एक नाही तर चार लग्ने केली होती. त्यांच्या दुसऱ्या लग्नाशी संबंधित एक किस्सा खुप गाजला होता. विनोद मेहरा यांचे पहिले लग्न त्यांच्या आईच्या इच्छेनुसार मीना ब्रोकासोबत झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद आणि मीनाचे फारसे पटत नव्हते आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर विनोद मेहरा यांच्या आयुष्यात अभिनेत्री बिंदिया गोस्वामी आली आणि लवकरच दोघांनी लग्न केले .

विनोद आणि बिंदियाच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आला जेव्हा विनोद मेहरा यांची कारकीर्द अपयशाकडे निघाली होती. बातम्यांनुसार, बिंदियाने विनोद मेहरा यांची बुडत चाललेली कारकीर्द पाहून त्यांना सोडले आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्याशी लग्न केले. या घटनेने विनोद मेहरा यांना खूप दुख झाले. यानंतर अभिनेते विनोद मेहरा यांनी अभिनेत्री रेखासोबत लग्न केले.

रेखाच्या आईला विनोद मेहरा अजिबात आवडला नव्हता आणि लग्नानंतर रेखाच्या घरी गेलेल्या विनोद यांनी रेखाच्या आईने मारहाण करण्यासाठी चप्पलही उचलली होती. त्यानंतर विनोद मेहरा यांचे चौथे लग्न किरण मेहरासोबत झाले होते. त्याच वेळी 1990 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे वयाच्या 45 व्या वर्षी निधन झाले. आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या विनोद मेहरा यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे आणि भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले होते. आजही त्यांच्या या गाजलेल्या चित्रपटांची चर्चा होताना दिसत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा