Wednesday, July 3, 2024

विनोद मेहरांनी ‘या’ चित्रपटात साकारली किशोर कुमारांच्या बालपणीची भूमिका; भोळेपणावर फिदा होत्या अभिनेत्री

चित्रपटविश्वात एक वेगळे आणि विशेष स्थान निर्माण करणारे अभिनेते विनोद मेहरा यांनी वयाच्या १३ व्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, असे म्हटले जाते की, इंडस्ट्री हे असे ठिकाण आहे, जिथे कोणाचा तारा चमकतो आणि कोणाची बोट कधी बुडते हे कोणालाच कळत नाही. विनोद यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दीत बरेच नाव कमावले, पण अनेक चित्रपटांतील सेकंड लीड म्हणून त्यांना आठवले जाते. ७० आणि ८० च्या दशकात प्रसिद्ध झालेले विनोद मेहरा यांना भलेही आजची पिढी विसरली असेल, पण एक काळ असा होता की, त्यांचे जबरदस्त फॅन फॉलोविंग होते.

साकारले होते किशोर कुमारचे बालपणीचे पात्र
विनोद यांचा जन्म १३ फेब्रुवारी, १९४५ रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्यावेळी विनोद मेहरा यांची मोठी बहीण सहाय्यक अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये काम करायची. अवघ्या १३ व्या वर्षी विनोद मेहरा यांना ‘रागिनी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. चित्रपटात त्यांनी किशोर कुमारची बालपणीची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

टॅलेंट शोमध्ये १० हजार लोकांनी घेतला होता भाग
युनायटेड प्रोड्यूसर्स आणि फिल्मफेअर यांनी मिळून १९६५ मध्ये टॅलेंट सर्च प्रोग्राम आयोजित केला. या टॅलेंट हंट प्रोग्राम दहा हजारांहून अधिक लोकांनी भाग घेतला होता. बिमल रॉय, बीआर चोप्रा, नासिर हुसेन, जीपी सिप्पी, ओम प्रकाश मेहरा आणि शक्ती सामंत यांसारख्या त्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शकांनी या टॅलेंट हंट प्रोग्रामचे परीक्षण केले. स्पर्धा इतकी मोठी होती की, ज्याने स्पर्धा जिंकली त्याला परीक्षक बनलेल्या सर्व दिग्दर्शकांसाठी प्रत्येकी एक चित्रपट करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर १२ चित्रपटांचा करारही केला. या स्पर्धेत १० हजार लोकांचा पराभव करून विनोद यांना दुसरा क्रमांक मिळाला. ते फक्त १ नंबरने राजेश खन्नाकडून पराभूत झाले होते.

१९७१ मध्ये चित्रपट कारकिर्दीची झाली सुरुवात
विनोद यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७१ मध्ये आलेल्या ‘एक थी रिटा’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तनुजा त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होत्या. इंग्रजी कादंबरीवर आधारित हा चित्रपट प्रचंड गाजला होता. विनोद यांची कारकीर्द पुढे नेण्यात अभिनेत्री मौसमी चॅटर्जींचा मोठा हात असल्याचे म्हटले जाते. त्यांनीच विनोद यांना टॅलेंट सर्च प्रोग्राममध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. शक्ती सामंतच्या ‘अनुराग’ चित्रपटात हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते. हा चित्रपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

विनोद मेहरा अभिनेत्रींमध्ये होते लोकप्रिय
विनोद मेहरा त्यांच्या काळात अभिनेत्रींमध्ये खूप लोकप्रिय होते. त्या काळात प्रत्येक अभिनेत्रीला विनोद मेहरा यांच्याजवळ यायचे होते. विनोद मेहरा हे त्या काळातील ‘चॉकलेट बॉय’ मानले जात होते. त्यांच्यावर मरणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रेखाचे नाव प्रथम येते. मात्र, जेव्हा रेखा आणि त्यांची जवळीकता वाढली, तेव्हा त्यांचे लग्न झाले. त्यांच्या जवळीकतेच्या प्रचंड चर्चा होत होत्या. असे म्हटले जाते की, कोलकातामध्ये लग्न केल्यानंतर विनोद मेहरा रेखाला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि रेखाने त्यांच्या पायाला स्पर्श करताच कमला मेहरा यांनी त्यांना लगेच धक्का दिला. त्यानंतर त्यांचे हे नाते संपले.

प्रतिष्ठेअभावी होते दुःखी
बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठा न मिळाल्याने विनोद मेहरा दुःखी राहू लागले होते. हळूहळू त्यांना कमी काम मिळाले, पण जेव्हा त्यांना वाटले की, असे चालणार नाही, तेव्हा त्यांनी एक दिग्दर्शक म्हणून आपले नशीब आजमावले. विनोद यांनी सुमारे १०० चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकापासून ते साईड रोलपर्यंत अनेक भूमिका साकारल्या. दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘गुरुदेव’ चित्रपट केला. ज्यात त्यांनी ऋषी कपूर, अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना कास्ट केले. त्या काळात त्यांना इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रियता मिळाली. असे म्हटले जाते की, हे कलाकार त्यांच्या स्वत: च्या इच्छेनुसार सेटवर येत असत. यामुळे ‘गुरुदेव’ बनवण्यात वेळच नाही, तर भरपूर पैसाही खर्च झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विनोद मेहरा यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित केला.

विनोद मेहरा यांचे झाले होते तीन लग्न
विनोद मेहरा यांचे पहिले लग्न मीना बोर्कासोबत झाले होते, जे एक अरेंज मॅरेज होते. विनोद मेहरा यांना लग्नानंतर लगेचच हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते. काही काळानंतर त्यांनी बिंदिया गोस्वामीशी लग्न केले, पण हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही आणि बिंदिया गोस्वामी सुद्धा त्यांच्यापासून विभक्त झाल्या. बिंदियाने जे.पी. दत्ताशी लग्न केले. यानंतर विनोद मेहरा आणि रेखा यांच्या लग्नाची माहिती येऊ लागली होती, पण दोघांनीही त्याला नकार दिला. विनोद यांनी १९८८ मध्ये किरणशी लग्न केले आणि १९९० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना एक मुलगा रोहन मेहरा आणि मुलगी सोनिया मेहरा आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धर्म वेगवेगळे असल्याने तिसऱ्याच धर्मानुसार केले सनाया अन् मोहितने लग्न; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-उर्मिला मातोंडकरने सांगितला गणेश उत्सवाचा अनुभव; म्हणाली, ‘आम्ही कोकणातील आमच्या घरी…’

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

हे देखील वाचा