अभिनेता आणि कॉमेडियन असलेला वीर दास त्याच्या अभिनयसोबतच विनोदी शैलीसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असून, त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले. पण अलीकडेच वीरने एक वादग्रस्त विधान करत वाद ओढवून घेतला आहे. त्याने त्याच्या वक्तव्यातून ट्रान्सजेंडर समुदायाच्या भावना दुखावल्या असून, त्याला त्याचे विधान चांगलेच महागात पडले आहे.
वीर दासने ट्रान्सजेंडर समुदायासाठी काही अपशब्दांचा वापर केला होता. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर बरेच ट्रोल केले गेले. पण वाद वाढत असल्याचे पाहून, वीर दासने एक पाऊल पुढे टाकत ट्रान्सजेंडर लोकांची माफी मागितली. त्याने त्याच्या वक्तव्याबद्दल उघडपणे सर्वांची माफी मागत एक निवेदन जारी केले असून, सोबत “मी चूक केली” असा मेसेज सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. (vir das apologizes after making derogatory on transgender community)
ही पोस्ट शेअर करत वीर म्हणाला, ‘मी New Ten On Ten च्या एका भागात तृतीयपंथी समुदायाविषयी एक विनोद केला, यामुळे या समुदायातील माझ्या एका मित्राला वाईट वाटले आहे. तेव्हा मला असे म्हणायचे होते की, जे सरकार करू शकत नाही ते तृतीयपंथी लोकांमध्ये करण्याचे धाडस आहे. पण त्यावेळी माझा गोंधळ उडाला आणि ते चुकीचे तुमच्यासमोर आले. आता माझा हेतू हा फक्त त्या विनोदाला स्पष्ट करण्याची जबाबदारी आहे.”
वीर पुढे म्हणाला, ‘अनेकदा लोकं अस्वस्थ होतात कारण कधी तरी विनोदाचा अर्थ वेगळा निघतो. माझा विनोद प्रेक्षकांना समजतो. ते सुद्धा त्याला एक विनोद समजूनच घेतात. त्यामुळे जेव्हा ते यावरून माझ्याशी बोलतात तेव्हा मी ते सर्व ऐकतो. माझी एक असा कलाकार होण्याची इच्छा आहे जो, कधीच त्याच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया स्वीकारणं थांबवणार नाही. मी नेहमी माझ्या रसिकांना माझा एक मार्गदर्शक म्हणून समजतो. अमान तुझ्या या मेसेजसाठी धन्यवाद.’
वीर दासने ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल केलेल्या कॉमेडीची जबाबदारी घेत आणि चाहत्यांशी साधलेल्या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर करत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याची चूक उघडपणे मान्य करत माफी मागितली. वीर दासची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी वीर दासच्या माफीनाम्याच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘बदमाश कंपनी’ फेम अभिनेता वीर दासने कॉमेडियन म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. वीर दासने आतापर्यंत कॉमेडियन म्हणून अनेक शो केले आहेत. त्याचबरोबर कॉमेडीमध्ये नाव कमावल्यानंतर त्याने २००८ साली ‘मुंबई साला’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटानंतर वीर अनेक चित्रपटांमध्ये दिसला. ‘रिवाल्वर रानी’, ‘मुंबई कलिंग’, ‘लव आज कल’ इत्यादी वीरचे हिट चित्रपट आहेत, याशिवाय त्याने सनी लियोनसोबत ‘मस्तीजादे’ चित्रपटात आणि अजय देवगण सोबत ‘शिवाय’ चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘या’ कारणांमुळे नक्कीच पाहा अजय देवगणचा वायूदलाचे शौर्य सांगणारा ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’
–परिणीती चोप्राला प्रचंड आवडतो सैफ अली खान; म्हणाली, ‘…मी लगेच हो म्हणू शकते’