Monday, July 1, 2024

Wedding vibes : अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे अडकले लग्नबंधनात, सोशल मीडियावर आला शुभेच्छांना पूर

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक लग्न समारंभ होत आहेत. यात एका लग्नाची मागील अनेक दिवसापासून चर्चा चालू होती. ते लग्न म्हणजे विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) आणि शिवानी रांगोळे (shivani rangole) यांचे लग्न. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक होते. अशातच या जोडप्याने मंगळवारी (३ मे) रोजी लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या आधी त्यांच्या मेहेंदी आणि हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विराजसने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, शिवानी ने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच विराजसने कुर्ता घातलेला दिसत आहे. त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले आहे. त्यांच्या लग्नात अनेकांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी डिसेंबर महिन्यात साखरपुडा करून सगळ्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यांनतर सगळे त्यांच्या लग्नाची वाट पाहता होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली.

सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराजस आणि शिवानी दोघेही कलाकार आहेत. विराजसने झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत काम केले आहे. तसेच शिवानीने ‘सांग तू आहेस का’ या मालिकेत काम केले आहे. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (mrunal kulkarni) यांचा मुलगा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा