Friday, July 5, 2024

विकी काैशल घेताेय मसाजचा आनंद, पाहा व्हायरल व्हिडिओ

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता विकी कौशल याने त्याची आई वीणा कौशलसोबतचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर शेअर केला असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये तो त्याच्या आईकडून मस्त मसाज करून घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये माय-लेकाची जोडी आनंदात दिसत आहे. कॅटरिना कैफ हिनेही सासूच्या वाढदिवसाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओमध्ये, विकी कौशल (vicky kaushal) याने राखाडी रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे आणि त्याच्या आईने एथनिक सूट घातला आहे. व्हिडिओमध्ये विकीची आई त्याच्या डाेक्याची मसाज करुन देत असल्यानं ताे खूप आनंदी आहे. विकीची आई त्याच्या डोक्याला तेल लावते आणि मसाज करुन देते. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला विकीने एआर रहमानचे ‘तू है’ गाणे लावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना विकीने लिहिले की, “हॅपी बर्थडे मा. तुमचा मार आणि मालक दोघांमध्ये सुख आहे! लव्ह यू.” तर कॅटरिना कैफ (katrina kaif) आणि नेहा धुपिया यांनी पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करून त्यांचे प्रेम व्यक्त केले. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना विकीच्या एका चाहत्याने लिहिले, ‘अमेझिंग क्षण.’ तर दुसऱ्या एका चाहत्याने, “तू इतका चांगला मुलगा का आहेस!” असे लिहिले. अनेक चाहत्यांनी वीणा कौशल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या मुलासोबतच्या तिच्या बंधानाची प्रशंसा केली. विकी हा शाम आणि वीणा कौशल यांचा मोठा मुलगा आहे. त्यांना सनी कौशल नावाचा लहान मुलगाही आहे.

विकी काैशलच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले,तर विकी कौशल लवकरच फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिक ‘सॅम बहादूर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या व्यतिरिक्त फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
मौनी रॉयसाठी ‘ब्रह्मास्त्र’ आहे खूपच खास; ओटीटी स्ट्रीमिंगबद्दल म्हणाली…

सई तम्हणकरच्या पोस्टला क्रांती रेडकरची ‘लक्षवेधी कमेंट, सोशल मीडियावर करतेय कतहर…

हे देखील वाचा