Saturday, June 29, 2024

महाविद्यालयाचा प्राध्यापक करत होता अश्लील मॅसेज; गायिकेने थेट सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत शिकवला धडा!

मनोरंजन विश्वाशी संबंधित असलेल्या महिला कलाकारांना अनेकदा त्यांचे कपडे, शरीराचा आकार आणि लूक्सवरून सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. अभिनेत्री आणि गायिका सौंदर्या नंदकुमार हिलाही सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला. आता या गोष्टीला कंटाळून, सौंदर्याने सोशल मीडियावर याची पोल खोलली आहे. एक महाविद्यालयीन प्राध्यापक गायिका सौंदर्याला अश्लील संदेश पाठवून त्रास देत होता. अशा परिस्थितीत, तिने या प्राध्यापकाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि थेट सोशल मीडियावरच त्याची शाळा घेण्यास सुरुवात केली.

महाविद्यालयीन प्राध्यापकाने असे संदेश पाठवल्याने सौंदर्या खूप दु:खी झाली आहे. गायिकेच्या म्हणण्यानुसार, महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून ते अशा अश्लील टिपण्णी करत आहेत, जे फार वाईट आहे. यासह तिने महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयीही चिंता व्यक्त केली आहे. असे प्राध्यापक जिथे शिकवत आहेत, तिथे मुलींना सुरक्षित कसे वाटेल याची चिंता गायिकेला आहे.

या मेसेजेनंतर सौंदर्याने इंस्टाग्रामवर त्या प्रोफेसरला ब्लॉक केले आहे. तिने लिहिले की, “प्राध्यापक अशा प्रकारे एका स्त्रीशी बोलतात. खूप लाजिरवाणे आहे. त्यांच्या प्रोफाईलनुसार, ते मदुराईमध्ये प्राध्यापक आहेत. मला त्या महाविद्यालयातील मुली सुरक्षित आहेत की, नाही याची काळजी वाटते.” अश्लील संदेश आल्यानंतर गायकीने लगेचच प्रोफेसरला इंस्टाग्रामवरून ब्लॉक केले.

त्याचबरोबर, आता सौंदर्याने घेतलेल्या या निर्णयाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. अनेक युजर्सने कमेंट करत, सौंदर्याच्या धैर्याचे कौतुक केले आहे. तथापि, अशा अश्लील कमेंट्सचा सामना करणारी ही एकमेव गायिका नाही. हे कलाकारांमध्ये खूप सामान्य झाले आहे. असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना कपड्यांपासून ते त्यांच्या कामापर्यंत ट्रोल केले जाते आणि त्यांच्यावर अश्लील कमेंट्स केल्या जातात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा