Friday, August 1, 2025
Home अन्य सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने सर्वचजण दुःखी झाले आहेत. अशातच त्याची जवळची मैत्रीण शहनाझ गिलची हालत तर आपण पाहिलीच. तिने बराच काळ स्वतःला चाहत्यांपासून, सोशल मीडियापासून आणि तिच्या कामापासून दूर केले होते. यामुळे, तिच्या जवळच्या मित्रांपासून ते चाहत्यांपर्यंत, सर्वांना तिच्याबद्दल काळजी वाटत होती. दरम्यान, एका महिन्यापेक्षा जास्त दिवस लोटल्यानंतर, आता हळूहळू ती सामान्य होत आहे. आजकाल अभिनेत्री तिच्या आगामी ‘होसला रख’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सोशल मीडियावर सध्या शहनाझ गिलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की, शहनाझने मुंबई कायमची सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सिडनाझचे चाहते खूप चिंतेत आहेत. पण हे पूर्ण सत्य नाही. माध्यमातील वृत्तानुसार, या केवळ अफवा आहेत. हा व्हायरल व्हिडिओ एका यूट्यूब चॅनेलने तयार केला आहे. जो अशा अर्धवट व्हिडिओंसाठी ओळखला जातो. (viral social after sidharth shukla death shehnaaz gill is leaving mumbai know the truth)

https://youtu.be/G4P9SmQ9Kxk

अलीकडेच सेटवर पोहोचलेल्या शहनाझच्या चेहऱ्यावर निरागसता आणि निराशा स्पष्टपणे दिसून येत आहे. ती हसण्याचा प्रयत्न करत असली, तरी चाहत्यांना तिच्या डोळ्यात निराशा जाणवली. या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिलं की, “या मुलीवर आमचा खूप जीव आहे.” तर दुसरा म्हणतोय की, “देव तुम्हाला खुश ठेवो. तुम्हाला शक्ती आणि आनंद मिळो.”

अलीकडेच, दिलजीत दोसांझने शहनाज गिलसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात सोनम बाजवा देखील त्याच्यासोबत दिसली. व्हिडिओ त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनचा आहे, ज्यात तिघेही एकत्र मजा करताना दिसले. शिवाय ‘हौसला रख’ दसऱ्याच्या मुहूर्तावर (१५ ऑक्टोबर) रिलीझ होत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा