बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने त्याची गर्लफ्रेंड आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. जॉर्जियाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचवेळी जॉर्जिया आणि अरबाज खाननेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. यात दोघांमधील प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. जॉर्जिया या फोटोंमध्ये हसत पोज देत आहे. त्याचबरोबर काही फोटोंमध्ये अरबाज खान जॉर्जियाला केक चारतानाही दिसतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अरबाज खान आणि जॉर्जियासोबत त्यांचा पाळीव कुत्रादेखील दिसत आहे. हॅपी बर्थडेची ट्यून बॅकग्राऊंडमध्ये ऐकू येत आहे. या व्हिडिओमध्ये जॉर्जिया खूपच सुंदर दिसत आहे. एका मुलाखतीत अरबाज खानने जॉर्जियाशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल बोलताना कबूल केले होते की, हे दोघेही नात्यात आहेत.
जॉर्जियाशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना अरबाज म्हणाला होता, “जर मला माझे नाते लपवायचे असते, तर मी ते उघडपणे बोललो नसतो. माझ्या आयुष्यात सध्या जॉर्जिया आहे, हे मी संकोच न करता स्वीकारतो. हे संबंध कुठपर्यंत जातील, हे फक्त वेळंच सांगेल. पण आम्ही एकत्र आहोत यात काही शंका नाही.”
तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणे थांबवता. तुम्ही एकतर चांगल्यासाठी बदलता किंवा सर्वात वाईटसाठी. अशा वेळी तुम्हाला दारूचे व्यसन लागू शकते आणि तुम्ही विचार करू लागता की, आपल्या आयुष्यात काहीही शिल्लक नाही. पण मी त्या स्थितीत नव्हतो. ती मला सकारात्मक राहण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत राहिली.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच
-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम
-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक