Friday, April 25, 2025
Home मराठी ‘बोल्ड एँड ब्युटीफुल’ फोटो शेअर करून मराठमोळ्या श्रुती मराठेने वाढवला इंटरनेटचा पारा!

‘बोल्ड एँड ब्युटीफुल’ फोटो शेअर करून मराठमोळ्या श्रुती मराठेने वाढवला इंटरनेटचा पारा!

मराठी सिनेसृष्टीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषेच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. यापैकीच एक अभिनेत्री आहे श्रुती मराठे. तिने मराठीसोबतच तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. श्रुती नेहमी अभिनयासोबतच आपल्या अदांनी देखील चाहत्यांना वेड लावत असते.

श्रुती मराठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. इथे तिला १२ लाखांहून अधिक युजर्स फॉलो करतात. अभिनेत्री नेहमी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर करत असते, ज्याला तिच्या चाहत्यांकडून खूप पसंती मिळते.

बहुतेकदा श्रुतीची चित्रपटातील भूमिका आणि इंस्टाग्राम फोटो पाहून असे वाटते की, तिला साधे राहणे पसंत आहे. पण श्रुतीची आणखी एक बाजू आहे, जी कधीकधी चाहत्यांना इंस्टाग्रामवर पाहायला मिळते. श्रुतीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे ‘बोल्ड एँड ब्युटीफुल’ फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा लूक अतिशय हॉट दिसत आहे. श्रुतीच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. त्यामुळे बघता बघताच हे फोटो व्हायरल झाले.

श्रुतीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर २००८ मध्ये तिने ‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. २००९ मध्ये श्रुतीने ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सुपरस्टार नासिरसुद्धा दिसला होता. विशेष म्हणजे, हा चित्रपट अक्षय कुमार, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘ऐतराज’ या बॉलिवूड चित्रपटाच्या कहाणीवर आधारित होता.

श्रुती मनोज वाजपेयीच्या ‘बुधिया सिंग’ या हिंदी चित्रपटातही दिसली होती. त्याचबरोबर तिने नाना पाटेकर यांच्या ‘वेडिंग ऍनिव्हर्सरी’ या चित्रपटात काम केले आहे. तिने २०१९ साली रिलीझ झालेल्या ‘बर्ड ऑफ ब्लड’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मीसोबत काम केले होते.

या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि मोठे यश या वेब सीरिजच्या हाती लागले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा