जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. ती नेहमीच आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना घायाळ करताना दिसते. कधी पारंपारिक साडी नेसून, तर कधी बोल्ड ड्रेसने ती सर्वांचे लक्ष वेधते. तिच्या ड्रेेसच्या किमतीही महागड्या असतात. आता तिचा असाच एक ड्रेस चर्चेत आहे. तिच्या या ड्रेसची किंमतही समोर आली आहे.
प्रियांकाने सन २०२१च्या ७४ व्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यामध्ये डिझायनर जॅकेट परिधान केले होते. या जॅकेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. या कार्यक्रमात तिच्यासोबत पती निक जोनासही होता, जो काळ्या रंगाच्या पोशाखात दिसला होता. रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये प्रियांकाने दोन आउटफिट परिधान केले होते. प्रियांकाने काळ्या रंगाच्या आउटफिट व्यतिरिक्त मॅन्डारिन कॉलरसह गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. याची किंमत ३९१५ युरो आहे. भारतीय चलनानुसार या जॅकेटसाठी ३,५२,०७५ रुपये द्यावे लागतील.
कार्यक्रमाच्या दुसर्या भागासाठी प्रियांकाने काळ्या रंगाचे आउटफिट परिधान केले होते. डच फॅशन डिझायनर रोनाल्ड व्हॅन डर कॅम्प यांनी डिझाइन केलेले काळ्या रंगाचे रेशमी मिकाडो जॅकेट प्रियांकाने घातले होते. फुल स्लीव्हज असलेल्या या जॅकेटमध्ये खोल नेकलाईन होती, ज्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.
या फोटोत प्रियांका एका वेगळ्या वेशात दिसत आहे. तिच्या या फोटोकडे बघून अगदी कोणीही तिच्या प्रेमात पडेल हे नक्कीच.
या फोटोत ती आपला पती निक जोनाससोबत झळकताना दिसली आहे. या वेशभूषेत प्रियांका निक सोबत अगदी सुंदर दिसते आहे.
या काळ्या रंगाच्या पोशाखात प्रियांका कमालीची आकर्षक दिसते आहे .
यामध्ये प्रियांकाच्या जॅकेटच्या पुढच्या बाजूला फुलांचे नक्षीकाम केले आहे, ज्यामुळे ती अधिकच हटके दिसत आहे.
यात प्रियांकाने अनेक दागिने परिधान केले आहेत, ज्यामुळे ती अधिकच खुलून दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-