Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड ‘आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद’, चाहत्यांनी राजू यांना वाहिली भावूक श्रद्धांजली

‘आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद’, चाहत्यांनी राजू यांना वाहिली भावूक श्रद्धांजली

कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) यांना बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनामुळे प्रत्येकाला धक्का बसला आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते एम्समध्ये व्हेंटिलेटरवर होते. 58 वर्षीय राजू गेल्या 41 दिवसांपासून जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चाहत्यांच्या कॉमेडीचे सर्वांनाच वेड लागले होते. त्यांची कॉमेडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. राजूच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या एका चाहत्याने श्रध्दांजली वाहिली, लिहिलं, “आमच्यापैकी अनेकांसाठी, राजू श्रीवास्तव हा पहिला स्टँड-अप कॉमेडियन होता. त्याने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज जिंकला नाही पण लोक त्याच्यामुळे शो लक्षात ठेवतात.”

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजूंच्या निधनानंतर पूर्ण खचून गेलीये पत्नी; म्हणाली, ‘मी बोलण्याच्या स्थितीत नाही, एवढंच सांगते…’

कधी मिमिक्री तर कधी ५० रुपयांसाठी चालवली रिक्षा, राजू श्रीवास्तव यांच्याबाबत कधीही न ऐकलेल्या गोष्टी
ट्रक क्लिनर म्हणून सुरुवात ते पहिली कमाई 50 रुपये , असा होता राजू श्रीवास्तव यांचा संघर्ष

हे देखील वाचा