Monday, July 8, 2024

‘दारु कमी प्या, पण लोकांना मदत करा,’ पाहा अभिनेत्री राखी सावंतने कुणाला दिलाय ‘हा’ सल्ला

राखी सावंतने ‘बिग बॉस १४’ द्वारे तिच्या निराळ्या स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही ती सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनते. याशिवाय राखी नेहमी चाहत्यांना मास्क लावायचे आवाहन करताना दिसते. लॉकडाउन दरम्यानही बोल्ड आणि बिनधास्त राखी सावंत मुंबईच्या रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहे. रस्त्यावर पीपीई किट परिधान करून, राखी कधी कॉफी तर कधी भाज्या खरेदी करताना दिसली. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पापाराझीला विचारत आहे की, “तुम्ही मद्यपान करता का?”

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने राखी सावंतला पीपीई किट घालण्यास भाग पाडले आहे. पुन्हा एकदा ती पीपीई किट घालून मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसली. नुकतेच, प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राखी पापाराझीसोबत बोलताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये, पापाराझी राखी सावंतला म्हणत आहेत की, “बाहेर जरा कमी या.” यावर राखी म्हणते की “मी पूर्ण पॅक आहे.” पुढे ती म्हणते, “दारू कमी प्या आणि त्या पैशांमधून पीपीई किट खरेदी करा आणि ते गरीबांमध्ये वाटा.” तेव्हा ती पापाराझीला विचारते, “तुम्ही दारू पिता का भाऊ.”

व्हिडिओमध्ये, राखी दोन-तीन पापाराझींना विचारते की, तुम्ही दारू पिता का? यानंतर ती म्हणाली, “ठीक आहे, दारूचे बजेट कमी करा आणि कोरोनामध्ये पीपीई किट वाटा, कारण मी सर्वांना पीपीई किट वाटत आहे. वर जाऊन देवाला उत्तर देखील द्यायचं आहे.”

या व्हिडिओमध्ये राखी पीपीई किटला पीपीटी किट म्हणून संबोधत आहे, ज्यामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले, “तिला सांगा की, ते पीपीई किट असतं, पीपीटी नाही.” त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले, “अशा चिल्लर एंटरटेनमेंटची कोणाला गरज आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एक अभिनेता जोमात, तर दुसरा कोमात! वरुण धवनने मारली झोपलेल्या वरुण शर्माच्या अंगावर उडी, पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाथी कमिंग! भन्नाट डान्स करत अभिनेता संदिप पाठकने समाजाला दिला मोलाचा सल्ला

-व्हिडिओ: जेव्हा अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीच्या फ्लाईंग किसबद्दल अनुष्काची केली थट्टा, ‘अशी’ होती अनुष्काची प्रतिक्रिया

हे देखील वाचा