Monday, July 8, 2024

धक्कादायक! अपघातात ‘हरियाणवी क्वीन’ सपना चौधरीचा मृत्यू? जाणून घ्या खरं काय ते

सोशल मीडियावर अनेकवेळा अफवा पसरवल्या जातात. अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर अगदी वार्‍यासारखी पसरत होती. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर, ‘हरियाणवी क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सपना चौधरीचा मृत्यू झाला आहे, अशी बातमी सर्वत्र वार्‍यासारखी पसरली आहे. यानंतर अनेक चाहत्यांनी सपनाचा मृत्यू झाला आहे, असे लक्षात घेऊन सोशल मीडियावर भावूक पोस्ट देखील केल्या आहेत. मात्र, या मागील सत्य काही वेगळेच आहे.

दिलखेचक डान्सने रसिकांची मने जिंकणारी सपना नेहमीच आपल्या डान्सच्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. मात्र, तिच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांच्या ह्रदयाचा ठोकाच चुकवला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की, सपनाचा रस्त्यावरून जात असताना अपघात झाला आहे आणि तिचा जागीच मृत्यू झाला. मात्र, व्हायरल झालेल्या या बातमीत काहीच तथ्य नाही. ही बातमी व्हायरल झाल्यामुळे लोकांना हे जाणून घ्यायचे होते की, सत्य नेमकं काय आहे?

खरं तर, जेव्हा सोशल मीडियावर सपना चौधरीच्या मृत्यूशी संबंधित फेसबुकवर पोस्ट जोरदार व्हायरल होऊ लागल्या, तेव्हा चाहत्यांनी तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. माध्यमांतील वृत्तानुसार, खरं तर, प्रीती नावाची एक डान्सर आहे. तिला कनिष्ठ सपना चौधरी म्हणून ओळखले जाते होते. रविवारी (२९ ऑगस्ट) हरियाणातील जवळच असलेल्या एक रस्त्यावर अपघात झाला, ज्यात चार लोक गंभीर जखमी झाले आणि एका ३० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ती एक संगीत कलाकार होती. सपना चौधरीच्या निधनाची बातमी याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता अनेक लोक पुन्हा तिच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत.

‘बिग बॉस’ च्या ११व्या पर्वामध्ये सपना दिसली होती. या शोमधे प्रवेश केल्यानंतर सपना सोशल मीडियावरही खूप चर्चेत आली. सपना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर सपनाचे एकापेक्षा एक हॉट फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात. ‘बिग बॉस’चा भाग होण्यापूर्वी सपना फक्त हरियाणवी गाण्यांमध्ये दिसली होती, पण तिला या शोमधून मिळालेल्या लोकप्रियतेनंतर तिने हरियाणवी ते पंजाबी, भोजपूरी आणि बॉलिवूड चित्रपटांतील आयटम साँगमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यासह तिचा प्रवास बॉलिवूडपर्यंत पोहोचला. ‘दोस्ती के साइड इफेक्ट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिमग्रा चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

हे देखील वाचा