Monday, July 1, 2024

‘पंजाबच्या कॅटरिना कैफ’चे देसी लूकमधील ठुमके व्हायरल; चाहत्यांना पाहायला मिळाली जुनी शहनाझ गिल

स्वतः ची ‘पंजाबची कॅटरिना कैफ’ अशी ओळख सांगणाऱ्या, ‘बिग बॉस १३’ फेम शहनाझ गिलची फॅन फॉलोविंग तगडी आहे. बिग बॉसमध्ये तिने सिद्धार्थ शुक्लासोबत मिळून, जबरदस्त टीआरपी मिळवला. शहनाज खूप चांगली एंटरटेनर आहे आणि ती चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे नवनवीन मार्ग शोधतच असते. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या शहनाझने, नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती देसी अवतारात ठुमके लावताना दिसत आहे.

शहनाझ गिलच्या फोटोंना आणि व्हिडिओंना चाहते खूप पसंत करतात. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बऱ्याच कालावधीनंतर जुन्या स्टाईलमध्ये दिसली आहे. सलवार सूटवर ओढणी घेतलेल्या शहनाझचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. व्हिडिओमध्ये ती लाल रंगाची ओढणी घेऊन, अगदी देसी स्टाईलमध्ये एका पंजाबी गाण्यावर नाचत आहे.

व्हिडिओमध्ये जुन्या शहनाझला पाहून चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत. यात ती ‘देओर दे व्याह’ या पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. शहनाझचा हा लुक चाहत्यांना खूप आवडला आहे, असे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. युजर्सने कमेंट बॉक्समध्ये शहनाजच्या कौतुकाचे अक्षरशः पूल बांधले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

कौतुक करत एका युजरने लिहिले की, “खूप जास्त ग्लो करत आहेस, तुला कोणाची नजर लागू नये.” दुसर्‍या युजरने लिहिले, “पंजाबन परत आली आहे.” एका इतर युजरने लिहिले, “बेबी फ्रॉक सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहेस.”

शहनाज गिल एक इंटरनेट सेन्सेशन आहे. गेल्या वर्षी लॉकडाउननंतर अभिनेत्री अचानक स्लिम लूकमध्ये दिसली होती आणि त्यांनतरपासूनच तिचा बोल्ड अवतारही पाहायला मिळत आहे. तिचा हा बदललेला अंदाज पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. तसेच, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ती बर्‍याच गाण्यांमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा