Monday, July 1, 2024

‘रोई ना जे याद मेरी आई वे…’, शहनाझ गिलचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना अश्रु अनावर

‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने जगाला अखेरचा निरोप दिला आहे. त्याच्या मृत्यूला रविवारी (१२ सप्टेंबर) १० दिवस झाले आहेत. सिद्धार्थचे चाहते अजूनही त्याची आठवण काढून भावुक होत आहेत. सोशल मीडियावर एकापाठोपाठ जुने व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांना ‘सिडनाझ’च्या जुन्या दिवसांची आठवण करून देत आहेत. तसेच चाहत्यांना शहनाझ गिलची प्रकृती कशी आहे? हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुक लागली आहे. ‘सिडनाझ’च्या चाहत्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात शहनाझ एक गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ आता चाहत्यांना भावनिक करत आहे.

‘सिडनाझ’शी संबंधित आठवणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहतेही प्रचंड भावुक होत आहेत. असाच एक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याचे बोल आहेत ‘रोई ना जे याद मेरी आई वे’. व्हिडिओमध्ये शहनाझ हे पंजाबी गाणे गाताना दिसत आहे. आता चाहते हे गाणे ऐकून तिला स्ट्रॉंग बनण्याचा सल्ला देत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शहनाझ खूप सुंदर दिसत आहे आणि ‘रोई ना’ हे गाणे गात आहे. पण सिद्धार्थच्या मृत्यूनंतर, जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा चाहत्यांचे डोळे ओले झाले आहे.

शहनाझच्या या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट येत आहे. सिध्दार्थचे अनेक चाहते तुटलेल्या ह्रदयाच्या ईमोजी शेअर करत आहे. तर अनेकजण भावुक कमेंट्स करत आहेत. सिडनाझचे चाहते कमेंट करत म्हणत आहेत की, “स्टे स्ट्राॅन्ग सना” तर दुसरीकडे एका युजरने लिहिले की, “गाण्यातील प्रत्येक शब्द खरा उतरला आहे आणि तसेच प्रत्यक्ष जीवनातही घडले आहे.”

सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाझबद्दल आलेल्या बातम्यांनी त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या वेळी शहनाझची झालेली अवस्था चाहत्यांना बघवत नव्हती. यामुळेच ‘बिग बॉस १३’ मधील या हिट जोडीचे जुने व्हिडिओ चाहते अनेकदा शेअर करत आहे, तसेच हे खूप व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

हे देखील वाचा