Wednesday, July 3, 2024

याला म्हणतात लोकप्रियता! शहनाज गिलच्या गळ्यात पडून रडायला लागली चाहती, व्हायरल व्हिडिओने नेटकरीही झाले भावुक

अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत येत असते.  ‘बिग बॉस 13’ मध्ये सहभागी झाल्यापासून ती लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे आणि तिचे फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. अलीकडेच, शहनाजचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शहनाजला पाहून एक चाहती चांगलीच भावूक झाल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हेतर तिच्या डोळ्यात अश्रूही आले. हे पाहून शहनाज स्वतःही भावूक झाली. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शहनाज गिल एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. यादरम्यान तिची एक चाहती तिच्याकडे धावत येते आणि तिला मिठी मारते.  क्लिपमध्ये ही चाहती तिच्या आवडत्या अभिनेत्रीला मिठी मारताना दिसत आहे. भावूक चाहतीच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यानंतर शहनाजने त्यांचे सांत्वन केले.

व्हिडिओमध्ये शहनाजही भावूक होताना दिसत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  एका चाहत्याने या व्हिडिओवर “हृदयाची राणी” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने माझ्या प्रिय बाळाला खूप प्रेम आणि आशीर्वाद, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर अनेकांनी “याला म्हणतात लोकप्रियता,” असे म्हणत शहनाजचे कौतुक केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर, शहनाज गिल पुढे सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये पूजा हेगडे आणि जस्सी गिल देखील आहेत. हा चित्रपट शहनाजचा बॉलिवूड डेब्यू असेल. शहनाजने आत्तापर्यंत या चित्रपटासोबतच्या तिच्या संबंधाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, अलीकडेच शहनाजचा एक फोटो व्हायरल झाला होता, जो ‘कभी ईद कभी दिवाली’च्या सेटवरून होता. या व्यतिरिक्त शहनाज गिल देखील व्लॉगिंग करत आहे आणि तिने अलीकडेच तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये शहनाज मान्सूनचा आनंद लुटताना दिसत आहे. ती महाराष्ट्रात नवनवीन ठिकाणे शोधत आहे.

हे देखील वाचा