दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाझ गिल यांची भेट ‘बिग बॉस १३’च्या घरात झाली होती. तेव्हापासून ते दोघे चांगले मित्र झाले होते. तसेच त्या दोघांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहत्यांना या दोघांची जोडी इतकी आवडली की, त्यांनी त्यांना ‘सिडनाझ’ असे नाव दिले. पण चाहत्यांनी कधीच विचार केला नव्हता की, त्यांच्या खास मैत्रीचा शेवट दुःखदायक टप्प्यावर होईल. शहनाझ सिद्धार्थवर खूप प्रेम करत होती आणि तिने ‘बिग बॉस १३’ मध्ये अनेक वेळा याचा खुलासा केला होता. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आता शहनाझ खूप दुःखी आहे. सिद्धार्थच्या अंत्ययात्रेत शहनाझची स्थिती पाहिल्यानंतर, चाहते त्यांचे जुने व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत. हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
शहनाझने सिद्धार्थवर असलेले प्रेम व्यक्त करत असल्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहून चाहते भावुक होत आहेत. तसेच सिद्धार्थ आपल्यासोबत नाही यावर चाहत्यांना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. पण हे खरे आहे की, नियती जे काही घडवून आणते ते स्वीकारने गरजेचं असतं. शहनाझ आणि सिद्धार्थ यांची जोडी तुटली. आता ‘सिडनाझ’च्या जोडीने घालवलेले सुंदर क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहतेही त्यांचे अश्रू रोखू शकत नाहीत.
https://www.instagram.com/p/CTZxvQSgddm/?utm_source=ig_web_copy_link
‘बिग बॉस १३’मध्ये शहनाझने जाहीरपणे सिद्धार्थला आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. ती म्हणाली की, “तु माझा आहेस आणि माझाच राहणार. मला गेम जिंकायचा नाही. मला तुला जिंकायचे आहे. तू हा खेळ जिंकावास अशी माझी इच्छा आहे.” या दरम्यान, सिद्धार्थनेही आपले प्रेम व्यक्त केले होते आणि म्हणाला की,“मी तुझ्यावर प्रेम करतो.” ‘बिग बॉस १३’मध्ये दोघांनी शेवटपर्यंत एकत्र वेळ घालवला, जे पाहून चाहते आता भावुक होत आहेत.
सध्या आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शहनाझ आणि सिद्धार्थचे नातेसंबंध दिसत आहे. त्यांच्यात असणारे बॉन्डिंग दिसत आहे. ‘सिडनाझ’ची जोडी नुकतीच ‘बिग बॉस ओटीटी’च्या मंचावर पोहोचली होती. तेव्हा शहनाझने करण जोहरसमोर सांगितले होते की, तिचे सिद्धार्थसोबतचे नाते खूप खास आहे. तेव्हा करणने विचारले की, “सिद्धार्थ तुझा मित्र आहे की बॉयफ्रेंड?” त्यावेळी पंजाबची कॅटरिना म्हणाली होती की, “बॉयफ्रेंडच्या नात्यापेक्षा भावनिक नाते जास्त महत्त्वाचे असते. बॉयफ्रेंड निघून जातात, पण माझे त्याच्याशी असलेले नाते कधीही तुटणार नाही.”
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर, शहनाझसोबतचे त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत, ते पाहून चाहतेही त्यांचे अश्रू रोखू शकत नाहीत. तसेच देवाला म्हणत आहेत की, देवाने सिद्धार्थला इतक्या लवकर आमच्यापासून दुर नेले. हे देवाने अजिबात चांगले केले नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…










