टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आजकाल तिच्या लेटेस्ट फोटोशूटबद्दल बरीच चर्चेत आली आहे. नुकतेच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे, ज्यात ती अधिकच तरुण दिसू लागली आहे. वाढत्या वयात ती फिटनेसच्या बाबतीतही तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करताना दिसत आहे. श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या फोटोशूटने चाहत्यांची मने लुटली आहेत.
श्वेता तिवारी वाढत्या वयासोबत अधिकच सुंदर होत चालली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. नुकतेच तिचे तिच्या या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. (viral social shweta tiwari caught everyones attention with bold acts shared her photos and said her heart)
या फोटोमध्ये श्वेताने चमकदार सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस व्हिक्टर रॉबिन्सने डिझाईन केला आहे. यात तिचा अतिशय हॉट अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री यामध्ये ज्याप्रकारे फोटोसाठी पोझ देत आहे, ते खरोखरच एखाद्याला वेड लावण्यासाठी पुरेसे आहे.
हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “गरज पडली तर सर्व नियम तोडा आणि त्यासाठी कधीही माफी मागू नका.” श्वेताने काही वेळापूर्वीच हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यावर आतापर्यंत तब्बल २ लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीही तिच्या फोटोवर कमेंट्स करून, तिचे कौतुक करत आहेत.
श्वेता आता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांशी संवाद साधण्याची एकही संधी ती सोडत नाही. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस वरुण बडोला समवेत ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेमध्ये झळकली होती. गेल्याच वर्षी ही मालिका ऑफ एअर झाली होती. ती टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मधील तिच्या अभिनयाने ती घराघरात पोहचली होती. याशिवाय अभिनेत्री ‘नागीन’, ‘सीता और गीता’ आणि ‘परवरिश- कुछ खट्टी कुच्छ मीठी’ यांच्यासह टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. तर आता अभिनेत्री ‘खतरो के खिलाडी’च्या १३व्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’
-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’