Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड ‘तेरा सूट’ गाण्यावर मुलाचा ब्रेक डान्स पाहून स्वतः टोनी कक्करही झाला चकित; व्हिडिओ शेअर करत केले कौतुक

‘तेरा सूट’ गाण्यावर मुलाचा ब्रेक डान्स पाहून स्वतः टोनी कक्करही झाला चकित; व्हिडिओ शेअर करत केले कौतुक

प्रसिद्ध गायक टोनी कक्कर याचे ‘तेरा सूट’ हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते आणि आतापर्यंत या गाण्याने सोशल मीडियावर देखील बरीच धमाल केली आहे. इतकेच नव्हे, तर या गाण्याची क्रेझ तरुणांमध्ये इतकी वाढली आहे की, अनेकांनी या गाण्यावर डान्स करून सोशल मीडियावर व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. या दरम्यान एका मुलाने या गाण्यावर ब्रेक डान्स केला आहे. हा डान्स टोनीला खूप आवडला आणि म्हणूनच त्याने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

मात्र, या मुलाचा ब्रेक डान्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार आहे. हा व्हिडिओ शेअर करत टोनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज या व्हिडिओने माझा दिवस बनविला आहे.”

https://www.instagram.com/p/CPLZEH8gHGR/?utm_source=ig_web_copy_link

टोनी कक्करच्या या प्रसिद्ध गाण्यात टीव्ही रियलिटी शो ‘बिग बॉस १४’ चे स्पर्धक अली गोनी आणि जॅस्मिन भसीन एकत्र दिसले होते. टोनीने शेअर केलेला हा डान्स व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अवघ्या २४ तासांच्या आत सुमारे ४ लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे.

विशेष म्हणजे, सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ केव्हा आणि कसा व्हायरल होईल, हे सांगणे जरा कठीण आहे. कारण या सर्व गोष्टी इंटरनेट युजर्सच्या हातात असतात. त्यांना जे आवडते, ते व्हायरल होण्यास जराही वेळ लागत नाही. सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ मानले जाते, जे प्रतिभावान लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या ठिकाणी लोक जगासमोर सहजपणे त्यांची कौशल्ये सादर करू शकतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा