Saturday, June 29, 2024

अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या फॅशन आणि सुंदर स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. ती तिच्या फॅशनने कायमच चाहत्यांची नजर आपल्यावर खिळवून ठवण्यात यशश्वी होते. सोशल मीडियावर उर्वशी कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. उर्वशीच्या जवळपास प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कंमेंट्सचा पाऊस पडत असतो. तिची एक झलक पाहण्याकरता चाहते कायमच आतुर असतात.

उर्वशी रौतेलाचं पहिलं आंतरराष्ट्रीय गाणं सध्या चर्चेत आहे. प्रदर्शित झाल्यापासून तिचे ‘वर्सासे बेबी’ हे गाणे पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या गाण्यात अभिनेत्री इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत दिसली आहे. या गाण्यातील उर्वशीची स्टाईल सर्वांना आवडत आहे, पण तिच्या लूकशी संबंधित अशीच एक गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या गाण्यात उर्वशी सुंदर बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली आहे. त्याची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाणार हे नक्की. या ड्रेसची किंमत आहे १५ कोटी रुपये! उर्वशीशी संबंधित सूत्रांकडून सांगण्यात येते की, तिचा ड्रेस तितकाच महाग आहे.

‘वर्सासे बेबी’ गाण्यात उर्वशीच्या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गाण्यात उर्वशी नेव्ही ब्लू बॉडीकॉन ड्रेस आणि रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली आहे. याशिवाय स्विमिंग पूलमध्ये ती बेज रंगाच्या बिकिनीमध्येही दिसली आहे. तिचे सर्व ड्रेस स्वत: डिझायनर दोनतिला वर्साचे यांनी डिझाइन केले आहेत, त्याची एकूण किंमत १५कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री सध्या जिओ स्टुडिओच्या “इन्स्पेक्टर अविनाश” च्या आगामी वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे. या वेब सीरिजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. उर्वशी लवकरच तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. हा एक मोठा बजेट सायन्स फिक्शन चित्रपट असेल, ज्यात उर्वशी आयआयटीन, आणि मायक्रोबायोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्नत झुबेर रहमानीचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पण अभिनेत्रीच्या आईनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष!

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

हे देखील वाचा