या जगात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची कमी नाहीये. अभिनेत्यांना पाहून त्याच्या चाहत्यांनी केवळ भेटण्याची आणि फोटो काढण्याचीच नाही, तर आठवण म्हणून ऑटोग्राफ घ्यायचाही इच्छा व्यक्त केली आहे. मात्र कधीकधी कलाकार यामुळे अडचणीत येतात. एकदा शाहरुखसोबत असेच काहीसे घडले, जेव्हा एका महिला चाहतीसाठी त्याला अक्षय कुमार बनावे लागले. हा रोचक किस्सा स्वतः शाहरुखने सांगितले होता.
शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ साजिद खान आणि रितेश देशमुख यांचा शो ‘यारों की बारात’चा आहे. एकदा शाहरुख आणि अनुष्का शर्मा पाहुणे म्हणून शोमध्ये उपस्थित झाले होते. संभाषणादरम्यान शाहरुखने एक मजेशीर किस्सा सांगितला. शाहरुख सांगतो की, एकदा तो विमानतळावर होता. या दरम्यान, एक महिला चाहती त्याच्याकडे आली आणि तिने फोटो काढण्याचा आणि ऑटोग्राफ देण्याचा आग्रह केला. शाहरुखच्या फ्लाइटची वेळ झाली होती. तो म्हणाला, “माझी फ्लाईट चुकेल असे मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती.” (viral social when shahrukh khan gave autograph as akshay kumar read funny story)
म्हणून त्याने धावत जाऊन अगोदर चेक इन केले आणि नंतर चाहतीकडे आला. त्यानंतर ती महिला जे म्हणाली ते ऐकून शाहरुखही चकितच झाला. ती म्हणाली, “मी तुमची मोठी चाहती आहे. आय लव्ह यू अक्षय.” शाहरुख खानचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले. मग जेव्हा शाहरुखला विचारले की तू काय केलेस, तेव्हा तो म्हणाला की, “मला त्या महिलेचे हृदय तोडायचे नव्हते, म्हणून मी तिला अक्षय कुमारच्या नावानेच ऑटोग्राफ दिला.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’
-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’