प्रत्येक पालकांची आपल्या मुलांना चांगली मूल्ये द्यावीत अशी इच्छा असते आणि जेव्हा त्यांच्या चांगल्या सवयीमुळे त्यांच्या मुलांची प्रशंसा केली जाते, तेव्हा प्रत्येक पालकांना अभिमान वाटतो. बऱ्याचदा सोशल मीडियाचा वापर करताना आपल्यासमोर अशाच पद्धतीच्या व्हिडीओ समोर येत असतात ज्यामधून आई वडिलांचे संस्कार, त्यांची शिकवण आपोआप दिसत असतात. यानंतर आपण सगळेच त्या व्हिडिओतील व्यक्तीवर आणि तिच्या शिकवणुकीवर आपल्या मनात सार्थ अभिमान वाटतो. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानेही अशाच दोन मुलांचं कौतुक केलं आहे.
रितेश देशमुख यांनी रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यावर झाकण घालून तो झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही मुलांचं कौतुक केलं आहे. त्याने लिहिलं, “प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांमध्ये ही मूल्ये स्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी या मुलांना आणि त्यांच्या पालकांना सलाम करतो. ”
Every parent should try to instil these values in their kids. I salute these kids and their parents. God Bless these two. https://t.co/lJIOWEWJMd
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 7, 2021
आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की जोरदार पावसात दोन मुलं रस्त्याच्या कडेला असलेला एक भला मोठा खड्डा झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दोघांच्या या उदात्त प्रयत्नाने सोशल मीडियावर बर्याच लोकांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे माहित नाही परंतु सोशल मीडियावर याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
एका युझरने सांगितले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी या मुलांकडून काहीतरी शिकलं पाहिजे.’ दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेसाठी सरकार जबाबदार आहे.’ हे काहीही असलं तरी या दोन मुलांवर मात्र चारही बाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.