Saturday, November 23, 2024
Home बॉलीवूड ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे…’, विरुष्कासह वामिकाचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सवर नेटकऱ्यांची आगपाखड; दिला माणूस बनण्याचा सल्ला

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे…’, विरुष्कासह वामिकाचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सवर नेटकऱ्यांची आगपाखड; दिला माणूस बनण्याचा सल्ला

कलाकार आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेक्षकांना खूपच रस असतो. आपले आवडते कलाकार चित्रपटांव्यतिरिक्त त्यांचे जीवन कसे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न सामान्य माणसं नेहमीच करतात. आता विराट आणि अनुष्काचेच घ्या ना. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर सर्व मीडियाला आणि फोटोग्राफर्सला देखील त्यांच्या खासगी जीवनाचा सन्मान करण्याची विनंती केली होती. मात्र, असे असूनही विराट आणि अनुष्का जिथे जातात तिथे त्यांच्या मागे फोटोग्राफर्स कॅमेरे घेऊन हजरच असतात.

नुकतेच विराट संपूर्ण भारतीय क्रिकेट टीमसह इंग्लंडला रवाना झाला. त्यांच्या संपूर्ण टीमसोबत अनुष्का शर्मा देखील ‘वामिका’सह होती. दरम्यान एअरपोर्टवर उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढण्याचा आणि वामिकाचा चेहरा दिसावा यासाठी खूप प्रयत्न केले. पण अनुष्काने वामिकाला पूर्णपणे झाकले असल्याने फोटोग्राफर्सला वामिकाचा चेहरा काही दिसला नाही. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स फोटोग्राफर्सवर चांगलेच चिडले आहे.

युजर्सने फोटोग्राफर्सला उद्देशून काही कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “अरे त्या मुलीला श्वास तरी घेऊ द्या.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे. वामिकाचा चेहरा न दाखवण्याच्या विराट अनुष्काच्या निर्णयाचा आपण सन्मान केला पाहिजे. जर त्यांना त्यांच्या मुलीचा चेहरा नाही दाखयवायचा.”

आणखी एकाने लिहिले आहे की, “कॅमेराची फ्लॅश लाईट किती त्रासदायक असते. याचा त्या बाळाला किती त्रास होत असेल? आधी स्वतः माणूस बना आणि इतरांनाही मांसासारखेच वागवा.”

काही दिवसांपूर्वी जेव्हा विराटने सोशल मीडियावर ask me anything नावाचे प्रश्न उत्तरांचे सेशन ठेवले होते, तेव्हा त्याला त्याच्या एका चाहत्याने तुम्ही वामिकाचा चेहरा जगासमोर कधी आणणार असे विचारले होते? यावर विराटने उत्तर दिले, “मी आणि अनुष्काने असे ठरवले आहे की, जोपर्यंत आमची मुलगी हे समजण्याइतकी मोठी होत नाही. तसेच मोठी झाल्यावर तीच ठरवेल तिची काय इच्छा आहे.”

सध्या अनुष्का शर्मा चित्रपटांपासून दूर असून ती तिच्या मुलीच्या संगोपनात व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा