आपण आतापर्यंत खेळाडूंना क्रिकेट, फुटबॉल यांसारख्या अनेक खेळांच्या मैदानावर डान्स करताना, एकमेकांची थट्टा करताना पाहिले असेल. असंच काहीसं पाहायला मिळालं ते क्रिकेटची बहुप्रतिष्ठित टी२० स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलच्या १३ व्या हंगामात.
गुरुवारी (१६ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात सामना झाला. या सामन्यात पंजाब संघाने ८ विकेट्सने हंगामातील दुसराच मिळवला. यादरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी मीम्स तयार केले आहेत.
या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की विराट हा सामना सुरु होण्याआधी संघसहकाऱ्यांसह सराव करत असताना मध्येच डान्स करायला सुरुवात करतो. यावेळी विराटने केलेला हा डान्स चाहत्यांना खूपच आवडला. त्यानंतर लगेचच काही चाहत्यांनी हा व्हिडिओ वेगवेगळी गाणी टाकून एडिट केला आहे.
एका ट्विटर वापरकर्त्याने तर मराठीतील ‘मला जाऊ द्या ना घरी’ या लावणीचे बोल असलेले गाणे वाजत असलेला हा विराटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
https://twitter.com/mansifule/status/1316750024563335169
https://twitter.com/Reality007_BB14/status/1316754777032720384
Dance pe chance maarle ❤️????
Virat Kohli playing his 200th T20 for RCB and looks excited!!!#IPL2020 #RCBvKXIP pic.twitter.com/pTWaW4R8HY
— Vinesh Prabhu (@vlp1994) October 15, 2020
त्यामुळे हे व्हि़डिओ देखील व्हायरल झाले आहेत.
https://twitter.com/Reality007_BB14/status/1316754777032720384