Friday, July 5, 2024

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत बीचवर दिसला शर्टलेस, पाहा व्हायरल फाेटाे

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली हे बॉलिवूडचे लाेकप्रिय कपलपैकी एक मानले जाते. आपल्या आवडत्या स्टार्सबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे चाहत्यांची पूर्ण काळजी घेत, अनुष्का आणि विराट त्यांच्या बिजी शेड्यूलमध्येही त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात आणि त्यांचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्यांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, आता अनुष्का आणि विराटचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघेही क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत.

विराट कोहली (virat kohli) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही बीचवर बसून खास क्षण घालवताना दिसत आहेत. दोघेही बीचवर ब्रेकफास्ट एन्जॉय करताना दिसत आहेत. फोटोमध्ये अनुष्काने पांढऱ्या रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला आहे आणि यासोबतच सनग्लासेस देखील लावला आहे. तर, विराट शर्टलेस आहे आणि त्याने खाली शॉर्ट्स घातलं आहे. विराट कोहली हातात पेयाचा ग्लास घेऊन पोज देत आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याची ही स्टाईल चाहत्यांनाही आवडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

11 जानेवारीला अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने मुलगी वामिकाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीचे खूप सुंदर फोटो शेअर केले हाेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

फोटोमध्ये अनुष्का गार्डन बेंचवर वामिकासोबत बसलेली दिसली. तर, विराट बागेत गवतावर पडलेला दिसला आणि वामिका त्याच्या पोटावर झोपलेली होती. या दोन्ही फाेटाेना चाहत्यांची पसंती मिळाली. यावर युजर्सनी कमेंट करत वामिकाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या होत्या. (virat kohli shares her shirtless photo with wife and actress anushka sharma from beach date goes viral on social media)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सुश्मिता सेनचे मित्र आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर

‘आपण आनंदी आहोत यावर आपला विश्वास नाही;, म्हणत प्राजक्ता माळीने सांगितले नैराश्याचे कारण

हे देखील वाचा