Monday, July 1, 2024

Virat Kohli: लंडनमध्ये बाप-लेकीची लंच डेट; ‘तो’ क्यूट फोटो व्हायरल

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी नुकतचं दुसऱ्या मुलाला जन्म दिल्याची बातमी दिली. अनुष्कानं लंडनमध्ये मुलाला जन्म दिला असून त्याचे नावं अकाय असं ठेवलं आहे. त्याची चर्चा जगभर सुरु असतानाच विराटचा वामिकासोबतचा क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये दोघेही लंच करताना दिसले.

मुलाच्या जन्मानंतर विरुष्का जोडी माध्यमांसमोर दिसली नव्हती. मात्र, त्यांचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. चाहत्यांनी विराटचा मुलगी वामिकासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये विराट आणि त्याची मुलगी हे दोघे एका कॅफेमध्ये जेवणासाठी गेले असल्याचे दिसते. वामिका तिच्या जेवणात व्यस्त आहे तर विराट फोनमध्ये व्यस्त दिसला.

यावेळी वामिकाने नेव्ही ब्लू आणि व्हाइट चेक स्वेटर घातलेला आणि तिचे लांब केस पोनीटेलमध्ये बांधलेले दिसले. या क्यूट फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. विराट आणि वामिकाच्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “किंग विथ प्रिंसेस” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, वामिका किती मोठी झाली हे विचारलं आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरी १५ फेब्रुवारीला मुलाचे आगमन झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

“सर्वांना सांगताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे की 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या मुलाचे आणि वामिकाच्या धाकट्या भावाचे या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर क्षणी आम्हाला फक्त तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा पाहिजे आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया यावेळी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा.” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.

वामिकाचा अर्थ काय?
विराट-अनुष्काने आपल्या पहिल्या लेकीचं नाव ‘वामिका’ असं ठेवलं आहे. वामिका हे नाव विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकरण आहे. तसेच या नावाचा खास अर्थदेखील आहे. ‘वामिका’ या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो ‘देवी दुर्गा’.

तर विराटच्या मुलाचं म्हणजेच ‘अकाय’ या नावाचा अर्थ काय?

. हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’ असा होतो. ज्याला कोणतंही स्वरुप, देह व आकार नाही असा निराकार. याशिवाय तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र (shining moon) असा होतो.

हेही वाचा:

Sidhu Moosewala: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या आईने दिली गुड न्यूज; ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा डान्स व्हिडिओ व्हायरल; युजर्स म्हणाले, ‘आता समजलं डिलिव्हरी यायला उशीर का होतो’

हे देखील वाचा