Saturday, December 28, 2024
[aioseo_breadcrumbs]

अनुष्का शर्माचा व्हिडिओ पाहून चाहते करू लागले विराट कोहलीचं कौतुक, काय असेल कारण?

गुरुवारी (24 मार्च)राेजी रात्री भारतीय क्रीडा सन्मान 2023 च्या मेळाव्यात क्रीडा जगतातील स्टार्सह चित्रपट कलाकारांनीही रंगत आणली. दीपिका पदुकोण ते रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, उर्वशी रौतेला, रिया चक्रवर्ती असे अनेक कलाकार यावेळी दिसले. अशात या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ खूप चर्चेत आहेत. एक व्हिडिओ म्हणजे रणवीर आणि दीपिकाचा, तर दुसरा व्हिडिओ म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा आहे. नेमके काय आहे व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023च्या इव्हेंटमध्ये विराट कोहलीसह अनुष्का शर्मा(anushka sharma)हिने कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्यात. कॅमेऱ्यासमोर विराटच्या हातात हात घालून अनुष्का शर्मा खूप अभिमानास्पद दिसत हाेती. मात्र, यानंतर जे काही झाले ते पाहून चाहते विराटवर काैतूकाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

खरं तर, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली रेड कार्पेटवर चालत असताना अनुष्काचा गाऊन मागून निट करण्यासाठी खाली झुकताे. पत्नी विषयी ही काळजी पाहून त्याचे चाहते कौतुक करताना थकत नाहीत आहेत. अप्रतिम जोडपे लिहून लोक दोघांचेही कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

त्याचबरोबर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा व्हिडिओही जोरदार चर्चेत आहे, पण कारण नकारात्मक आहे. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दीपिका रेड कार्पेटवर रणवीर सिंगकडे दुर्लक्ष करताना दिसली आहे. व्हिडिओमध्ये रणवीर दीपिकाकडे हात पुढे करताे, पण दीपिका त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाते. अशात हा व्हिडिओ पाहून लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत आणि दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नाही ना अशी शंका वर्तवली आहे.( virat kohli takes care of bollywood actress anushka sharma gown and deepika padukone ignored ranveer singh videos goes)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तामिळ सुपरस्टार अजित कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

पारंपरिक वेशभूषेत कीर्तीने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा